+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustराजारामपुरी होणार स्त्री शक्तीचा जागर* adjustयशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) काॅलेज मध्ये "आपत्ती व्यवस्थापन" भित्तीपत्रकाचे आयोजन adjustपत्नीची विचारपूसही न करणाऱ्या पतीला दणका दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे न्यायालयाचे आदेश adjustनिगवे खालसा येथील श्री नृसिंह सरस्वती मंदिरास २ कोटींचा निधी; मा.आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश* adjustविद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे adjust*डी वाय पाटील अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांची* *‘इस्रो’ सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी निवड* adjustमुहम्मद असिफ खलील मुजावर यांना ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार adjustशरद गायकवाड यांना 'क्रांतीबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक' पुरस्कार adjustकोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ८१ प्रभागांमध्ये आंदोलन adjustपिआरपी कोल्हापुरातील विधानसभेच्या दोन जागा लढविणार
schedule01 Jun 24 person by visibility 174 categoryशैक्षणिकशैक्षणिक


कसबा बावडा
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने 'दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया' याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. बुधवार (दि. ५ जून) सकाळी ९.३० वाजता कसबा बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे.

   दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी हा टप्पा फार महत्त्वाचा ठरतो. दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे? याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट ध्यानात घेऊनच डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत ? करिअर क्षेत्र कसे निवडावे ? याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. 

त्याबरोबरच डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे होते, प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, शासनाच्या वतीने कोणकोणत्या स्कॉलरशिप दिल्या जातात, याबद्दलही कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे.

या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य प्रा. नितीन माळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.