+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule10 Feb 24 person by visibility 83 category
आवाज इंडिया

कोल्हापूर :- डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप स्पर्धेचे शनिवारी ग्रुपचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते .उद्घाटन झाले. यावेळी डॉ. संजय पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, सदानंद सबनीस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

      सन 2018 पासून डी. वाय पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर मैदानावर प्रेसिडेंट कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. डी वाय पाटील ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांचे संघांचा या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी स्पर्धेचे 6 वे वर्ष असून एकूण 24 संघांमध्ये ही स्पर्धा होत आहे. डॉ संजय डी पाटील यांच्या वाढदिनी 18 फेब्रुवारीला अंतिम सामना रंगणार आहे या स्पर्धा विद्युत झोतात खेळण्यात येणार आहेत.

    डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतूराज पाटील, तेजस पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती या स्पर्धेचे शनिवारी सायंकाळी उद्घाटन झाले. यावेळी डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, तेजस पाटील यांनी फलंदाजीचा आनंद लुटला. या स्पर्धेमुळे कर्मचारीमध्ये खिलाडूवृत्ती वाढेल. सांघिक गुण निर्माण होऊन कार्यक्षमता वाढेल असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
  
    डी वाय पाटील हॉस्पिटल आणि सेंटर फॉर इंटर डीसीप्लेनरी रिसर्च या दोन संघांमध्ये सलामीचा सामना झाला. डी वाय पाटील हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, अभियांत्रिकी, अभिमत विद्यापीठ, सीआयआर, फार्मसी व फिजिओथेरपी, नर्सिंग, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, कृषी व तंत्र विद्यापीठ अ व ब, टेक्निकल कॅम्पस वॉरियर्स व एलेव्हन, अभियांत्रिकी साळुंखे नगर, हॉटेल सयाजी, प्रोजेक्ट टीम, ज्ञानशांती बंगलो, एच के चॅलेंजर्स, सिटी मॉल, अजिंक्यतारा, कॉर्पोरेट, शुगर फॅक्टरी, कॉन्ट्रॅक्टर्स आदी संघांचा या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.