डॉ.डी. वाय .पाटील जुनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सीए फाउंडेशन परीक्षेत यश*
schedule10 Feb 24 person by visibility 146 category
कोल्हापूर :आवाज इंडिया
कोल्हापूर: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कडून डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
ज्युनियर कॉलेजच्या निनाद विनायक जोशी यांनी 400 पैकी 361 गुण मिळविले असून गणित विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवले आहेत. मृणाल मनोज महाडेश्वर हिने 335 गुण , श्रुती सचिन जोशी हिने 334 गुण तर पवन संभाजी येलकर याने 302 गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले आहे.
महाविद्यालयाच्या निशांत माजीदूर रेहमान हिने 291 गुण, आदित्य मुरारी खोत 261 गुण ,हर्ष सुशांत ओतारी 248 गुण, केदार गजानन सुभेदार 241 गुण ,अनन्या जयदीप पाटील 228 गुण ,साक्षी कृष्णात पाटील 225 गुण, तर तन्वी सतीश कोरडे हिने 218 गुण मिळवत या संपादन केले आहे.
सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठीची पहिली पायरी म्हणून ही परीक्षा ओळखली जाते. या विद्यार्थ्यांना कॉमर्स शाखेच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
सीए फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील , विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील , सल्लागार अशोकराव देसाई व प्राचार्य ए बी पाटील यांनी अभिनंदन केले.