Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*

जाहिरात

 

डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न*

schedule29 Jan 25 person by visibility 290 categoryशैक्षणिक

*डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न*
*२४३ विद्यार्थ्यांचा सहभाग*
 
कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकसह जिल्ह्यातील पंधरा पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 
 
 टाटा मोटर्सचे सीनियर मॅनेजर संजय भोळे, एच. आर. ऑफिसर राजेश रोकडे, ऋषिकेश गुंड यांनी या इंटरव्यू घेतल्या.या कॅम्पस इंटरव्यू मध्ये डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकसह डी.वाय. पाटील तळसंदे, बापूजी साळुंखे पॉलिटेक्निक, न्यू पॉलीटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कराड, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कोल्हापूर, संजय घोडावत पॉलिटेक्निक, आय.सी.आर.ई पॉलीटेक्निक गारगोटी, ए.डी.शिंदे पॉलिटेक्निक गडहिंग्लज, शरद पॉलिटेक्निक यद्राव लठ्ठे पॉलिटेक्निक, भारती विद्यापीठ, पीव्हीपीआयटी बुधगाव, अशोकराव माने पॉलिटेक्निक येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
यावेळी बोलताना डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी, विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून टाटा मोटर्स सारख्या नामवंत कंपनीमध्ये जॉबची संधी प्राप्त झाली आहे.
डिप्लोमा करत असताना कॅम्पस इंटरव्यू मध्ये मिळालेली संधी न दवडता ताकदीने प्रयत्न करावी.
जॉब मिळवताना टेक्निकल नॉलेज, अनुभव, टीमवर्क, ह्यूमन रिसोर्स व्यवस्थापन या महत्त्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
टाटा मोटर्सचे सीनियर मॅनेजर संजय भोळे यांनी, टाटा . मोटर्स ही एक कंपनी नाही तर एक फॅमिली असल्याचं सांगितलं. प्रॅक्टिकल ज्ञान आणि अनुभव अधिक महत्त्वाचे आहे. सर्टिफिकेट आणि त्या जोडीला अनुभव असेल तर भविष्यात तुम्हाला अजून मोठ्या संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.
 
यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अजय बंगडे, विभाग प्रमुख प्राध्यापक शितल साळोखे, प्राध्यापक एस.बी.शिंदे, विविध 15 पॉलीटेक्निकचे विद्यार्थी उपस्थित होते.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes