प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे कोरोनाने निधन
schedule30 Apr 21 person by visibility 735 categoryसंपादकीय

दिल्ली : बहुचर्चित आणि प्रसिद्ध पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. नोएडा येथील मेट्रो हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या वार्तेने आज तक परिवारात मोठा धक्का बसला आहे.
रोहित सरदाना यांनी आज तक या हिंदी प्रसारमाध्यमात काम केले होते. त्यांनी झी न्यूज आणि आज तक या हिंदी चॅनलमध्ये पत्रकारिता केली होती.
आज शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले असल्याचे समजते. ते कोरोना पॉझिटिव्ह होते.