+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
schedule20 Mar 24 person by visibility 42 category
गोकुळ’ चे तूप व दही पुणे येथील सर्व डी मार्ट स्टोअर मध्ये उपलब्ध

मा.श्री.अरुण डोंगळे

चेअरमन- गोकुळ दूध संघ

पुणे ता.१९: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) चे तूप, दही व इतर दुग्धजन्य पदार्थ पुणे विभागातील सर्व डी मार्ट स्टोअर मध्ये विक्री करीता उपलब्ध करण्याबाबतचा करार डी मार्ट व गोकुळ यांचे मध्ये करण्यात आला त्या अनुषंगाने गाय तूप सहा टन (६००० किलो) तर दही दीड टन (१५०० किलो) अशी पहिली खरेदी ऑर्डर डी मार्ट चे व्हा. प्रेसिडेंट ऑपरेशन्स श्री उत्तम पाटील यांनी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडे पुणे येथे दिली.

          यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ ब्रॅण्‍डची उत्‍पादने गुणवत्‍तापूर्ण असल्‍याने पुणे येथील ग्राहकांना गोकुळची उत्‍पादने खरेदी करून गोकुळला मानाचे स्‍थान निर्माण करून दिले आहे. पूणे मार्केट मधील गोकुळच्या दुध, तूप, दही व इतर दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीचा विचार करता गोकुळची दर्जेदार उत्पादने पुणे येथील सर्व डी मार्ट मध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेणेत आला. सध्या पुणे विभागातील सर्व डी मार्ट स्टोअर मध्ये गोकुळ दुधाची विक्री चांगल्या प्रमाणात होत आहे. आता दूधाबरोबर तूप व दही तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांची उपलब्धता होणार असून याला देखील चांगला प्रतिसाद मिळेल. असा विश्वास गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला.

          याप्रसंगी डी मार्ट चे व्हा. प्रेसिडेंट ऑपरेशन्स उत्तम पाटील म्हणाले कि, गोकुळने बाजारपेठेमध्ये आपल्या दर्जेदार उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. आमच्या ग्राहकाकडून गोकुळची उत्पादने विक्रीस ठेवणे बाबत विचारणा होत होती, त्याच वेळी संघाचे मार्केटींग अधिकारी सुजय गुरव व त्यांच्या टीमने हा करार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. भविष्यात डी मार्ट मधील गोकुळ उत्पादनांच्या विक्रीचा आलेख वाढत जाईल असे सांगितले.

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सहा.महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील, पुणे विभागातील मार्केटिंग अधिकारी सुजय गुरव, पांडुरंग गायकवाड तर डी मार्ट चे व्हा. प्रेसिडेंट ऑपरेशन्स उत्तम पाटील, अधिकारी राजेश मिश्रा, विनोद घोडेकर आदी उपस्थित होते.