Awaj India
Register
Breaking : bolt
राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्काराने सचिन कदम यांचा गौरव*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड*कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोसपुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*माहिती अधिकार नियम २०२६ विरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक;* डॉ. महादेव नरके यांचे पुस्तक विद्यार्थी आणि संशोधकांसाठी दिशादर्शक – डॉ. संजय डी. पाटील*डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये* *१२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया*नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्याच्यावर कारवाई करा

जाहिरात

 

हुपरीत ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन; रक्तासाठीची नागरिकांची धावपळ थांबणार

schedule15 May 26 person by visibility 214 categoryराजकीयआरोग्य

कोल्हापूर : आवाज इंडिया प्रतिनिधी 

छत्रपती ग्रुप यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त हुपरी येथे ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन आणि रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या ब्लड सेंटरमुळे हुपरीसह पंचक्रोशीतील नागरिकांना रक्तासाठी अन्य शहरांत जाण्याची गरज भासणार नसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या ब्लड सेंटरचे उद्घाटन हुपरीचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील, नगरसेवक रोहित शेटे, अमेय जाधव, डॉ. स्वप्नील हुपरीकर, नगरसेविका रुपाली उगळे, युवासेना शहरप्रमुख अजित उगळे तसेच मराठा समाजाचे अध्यक्ष साताप्पा गायकवाड उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ रक्तसेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रमोददादा पाटील यांनी सांगितले. तर डॉ. संदेश जंगले आणि छत्रपती ग्रुपचे संपर्कप्रमुख सौरभ खोत यांनी आणीबाणीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, हेच या ब्लड सेंटरमागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.
या रक्तदान शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे पत्रकारांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. पत्रकार अमोल सवाईराम, विठ्ठल मोहिते, सुलतान नदाफ, महेश कळंत्रे आणि शहाबुद्दीन घुडूभाई यांनी रक्तदान करत सामाजिक संदेश दिला. महिलांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वसुंधरा देशमुख, डॉ. प्रकाश गिरी, मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुधीर गिरी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव, रेंदाळचे उपसरपंच मुकुंद पतंगे, ग्रामपंचायत सदस्य मेहबूब मुजावर, पत्रकार अल्लाउद्दीन मुल्ला आणि सतिश कंगणे उपस्थित होते.
तसेच डॉ. विनायक मेथे, बडूपंत फिरगान, आशा ग्रुपचे डॉ. मृत्युंजय जंगले, छत्रपती ग्रुपचे शहरप्रमुख अभिनंदन माणकापुरे, सोशल मीडिया प्रमुख उमाजी लाड, शुभम चोपडे यांच्यासह पदाधिकारी, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉस्पिटल स्टाफ आणि महालक्ष्मी ब्लड बँक यांच्या टीमने या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. या ब्लड सेंटरमार्फत देण्यात येणाऱ्या विशेष हेल्थ कार्डमुळे नागरिकांना सवलतीच्या दरात उपचार मिळणार असल्याने परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes