Awaj India
Register
Breaking : bolt
अंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथाभारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ सप्टेंबरला जाहीर स*आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीप्रकरणी आरती आंबी पुणे कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार...* *डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला* *‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे**बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड* *आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन*जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

जाहिरात

 

मितभाषी संयमी आणि विकासकामांची जाण असलेल्या अमल महाडिकांना जनता पुन्हा आमदार करेल - महादेव जानकर

schedule02 Mar 24 person by visibility 405 categoryराजकीय


           कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 71, 73,74,80 आणि 81 या प्रभागांमध्ये विधान परिषद सदस्य आमदार महादेव जानकर यांच्या शिफारसीतून प्राप्त झालेल्या विशेष निधीतून तब्बल पाच कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत. 

           माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज आमदार महादेव जानकर, माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला. 

            या निधीतून प्रभागांमधील अंतर्गत रस्ते,गटर्स तसेच सभागृह उभारणीची कामे होणार आहेत. यावेळी बोलताना आमदार महादेव जानकर यांनी अमल महाडिक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. 

          अत्यंत मितभाषी आणि संयमी स्वभावाच्या अमल महाडिक यांनी मदत केल्यामुळेच मी विधानपरिषद आमदार होऊ शकलो,या मदतीची उतराई करण्यासाठीच हा निधी दिल्याचे जानकर म्हणाले. 

           अमल महाडिक यांनी पदावर नसतानाही विकास कामांचा केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. आगामी निवडणुकीत जनता नक्कीच याची जाण ठेवून महाडिक यांना पुन्हा आमदार बनवेल असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. 

           विरोधकांनी विकास कामांबद्दल पसरवलेल्या संभ्रमाचाही जानकर यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. श्रेयवादाचे राजकारण बंद करा असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. 

         यावेळी या चारही प्रभागांमधील नागरिकांच्या वतीने आमदार महादेव जानकर यांचा सत्कार करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेविका मनिषा कुंभार, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, अमोल माने, रिंकू देसाई, राजू मोरे,अविनाश कुंभार, रासप पश्चिम महाराष्ट्र सचिव अजित पाटिल, रासप कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील, अक्षय शेळके यांच्यासह मान्यवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes