Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई; शरीरास घातक इंजेक्शन आणि गांजासह दोघे ताब्यातइचलकरंजीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; सव्वा दोन लाखांच्या गांजासह दोघे जेरबंदशिवसेना समन्वयक सत्यजित (नाना) कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमकामगिरी दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ जि.प प्रशासनाला इशाराडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत प्रथमशिक्षकांच्या कमतरतेवर जिल्हा परिषद सदस्यांचा मदतीचा हातके. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?

जाहिरात

 

कोल्हापुरात अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई; शरीरास घातक इंजेक्शन आणि गांजासह दोघे ताब्यात

schedule03 May 26 person by visibility 47 categoryगुन्हे

 
​कोल्हापूर:
तरुणांमध्ये शरीरयष्टी कमावण्यासाठी घातक औषधांचे सेवन करण्याचे वाढते व्यसन आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कोल्हापूर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि जयसिंगपूर उपविभागीय पोलीस पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ४८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  
​जीवावर बेतणारी 'मेफेनटेरमाईन सल्फेट' इंजेक्शन्स जप्त
​सध्या तरुणांमध्ये कमी वेळात शरीर धष्टपुष्ट दिसण्यासाठी 'मेफेनटेरमाईन सल्फेट' (Mephentermine Sulphate) सारखी घातक औषधे वापरण्याची चुकीची सवय लागली आहे. या औषधांच्या वापरामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचा धोका असतो.  
​दिनांक २ मे २०२६ रोजी जयसिंगपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना माहिती मिळाली की, सदर बाजार परिसरातील स्वप्निल माने हा तरुण आपल्या घरातून अशा घातक इंजेक्शन्सची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ७७ सीलबंद बाटल्यांसह विनायक रवींद्र माने (वय २३, रा. रुईकर कॉलनी) या कामगाराला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
​राजारामपुरीत गांजा ओढणाऱ्यावर कारवाई
​दुसऱ्या एका कारवाईत, राजारामपुरी येथील 'गावरान मिसळ' जवळ गांजाची विक्री आणि सेवन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याठिकाणी छापा टाकला असता प्रज्वल दिनेश देवगिरीकर (वय २७, रा. ११ वी गल्ली, राजारामपुरी) हा गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  
​या पथकाने केली कारवाई
​ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक शेष मोरे, युनुस इनामदार, गिरीष शिंदे आणि पोलीस अंमलदार संतोष बरगे, वैभव पाटील, शुभम संकपाळ, अरविंद पाटील, प्रवीण पाटील, लखनसिंह पाटील, अमित सर्जे व सत्यजित तानुगडे यांचा सहभाग होता.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes