Awaj India
Register
Breaking : bolt
आरोग्य समिती बैठकीत सदस्यांच्या ठोस सूचनांचा वर्षाव; ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत उपाययोजनांवर भरकोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांची संघर्षमय वाटचालशिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमालीबुद्ध जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान व बौद्ध वधू-वर मेळावा; डिंगे फाउंडेशनचा उपक्रमगोकुळ’च्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकस्मार्ट सर्व्हिसेस'ने ऊसतोड कामगारांची नोंदणी अचानक थांबवली; महाराष्ट्र ऊस तोडणी संघटनेचा मुंबई मोर्चाचा इशाराकोल्हापूर जिल्हा दूध संघावर (गोकुळ) प्रशासकडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती*अन्यायाला न जुमानणारे बंडखोर नेतृत्व : भावी आमदार सत्यजित उर्फ नाना कदमआठवणींचा ओलावा… शब्दात न मावणारी पोकळी

जाहिरात

 

आरोग्य समिती बैठकीत सदस्यांच्या ठोस सूचनांचा वर्षाव; ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत उपाययोजनांवर भर

schedule06 May 26 person by visibility 6 categoryआरोग्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद कोल्हापूरच्या आरोग्य समितीची बैठक मंगळवार, ५ मे २०२६ रोजी स्व. वसंतराव नाईक समिती सभागृहात मा. सारिका यशवंत नांदेकर (सभापती) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विविध सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभापती मा. सारिका यशवंत नांदेकर यांनी ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य निधीचा प्रभावी वापर करावा, साथीचे रोग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, कुष्ठरोग शोध मोहिमेला गती द्यावी तसेच एचपीव्ही लसीकरण मोहिमेसाठी जनजागृती वाढवावी, अशा विविध सूचना केल्या. तसेच “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानात जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवावे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
मा. सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी ग्रामपंचायतींना आरोग्य निधी वापराबाबत स्पष्ट सूचना देण्याची गरज व्यक्त केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या इमारतींचा दर्जा सुधारावा आणि समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमित बाह्यरुग्ण सेवा देऊन दुपारी गृहभेटी कराव्यात, यावर भर दिला.
मा. डॉ. वर्षा सावर्डेकर यांनी साथीचे रोग टाळण्यासाठी अतिजोखमीच्या ग्रामपंचायतींमध्ये विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच एचपीव्ही लसीकरणासाठी शाळांमध्ये विद्यार्थी-पालक मेळावे घेऊन व्यापक जनजागृती करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
मा. सुदर्शन खोत यांनी कुष्ठरोगाच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त करत आशा कर्मचारी व आरोग्य सेवकांनी घरभेटीद्वारे संशयित रुग्ण शोधण्यावर भर दिला. यावर वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे त्यांनी नमूद केले.
मा. क्रांतीसिंह पवार पाटील यांनी “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” अभियानात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर यावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
मा. रचना गावडे यांनी आशा कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची मागणी केली.
मा. सोनाली सावंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली.
या बैठकीस मा. पूजा पाटील यांच्यासह सर्व सदस्य, डॉ. अनिरुद्ध पिंपळे (जिल्हा आरोग्य अधिकारी व सदस्य सचिव), विविध विभागांचे अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आरसीएच इंडिकेटरमध्ये कागल तालुका तिसऱ्या व गडहिंग्लज तालुका चौथ्या क्रमांकावर आल्याबद्दल समितीने समाधान व्यक्त करत संबंधितांचे अभिनंदन केले.
सभेच्या शेवटी डॉ. एम. बी. देशमुख (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी) यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes