पूजा शिंदे यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'
schedule06 Mar 25 person by visibility 507 categoryआरोग्यसामाजिक

कोल्हापूर
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथील पूजा शिंदे यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
शिंदे यांनी आतापर्यंत 25 वर्षे आरोग्य सेवेत काम केले महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशन पुणे येथे सदस्य म्हणून काम केलेले आहे तर महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस कोल्हापूर कोषाध्यक्ष ही जबाबदारी पार पाडली आहे. कोल्हापूर जिल्हा परिचर्या शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था येथे संचालक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. कोरोणाच्या काळात त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.