Awaj India
Register
Breaking : bolt
हुपरीत ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन; रक्तासाठीची नागरिकांची धावपळ थांबणारNEET परीक्षेतील घोटाळ्याचा निषेध; कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देणारग्रामीण विकासासाठी अध्यक्षा शिल्पा खोत यांचा धडाकेबाज तालुका दौरा; गडहिंग्लजमध्ये नागरिकांच्या समस्यांवर प्रशासन तत्परकोल्हापूरच्या पाच तालुक्यांत आता फुलणार ‘पांढरे सोने’; ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेसाठी १० मे पासून अर्ज प्रक्रिया सुरूविनाअनुदानित शाळांना कोल्हापूर खंडपीठाचा मोठा दिलासा; जाचक शासन निर्णय रद्द!कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान*कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे 'कर्जमाफी आंदोलन'; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडककोल्हापुरात महिला सक्षमीकरणासाठी 'स्वराज्य महिला मंच' सज्ज; आज कार्यालयाचे भव्य उद्घाटनडॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विशेष शोप्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालय उभारणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर*

जाहिरात

 

NEET परीक्षेतील घोटाळ्याचा निषेध; कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देणार

schedule15 May 26 person by visibility 16 categoryराजकीय

आवाज इंडिया प्रतिनिधी 
​कोल्हापूर:
देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असलेल्या NEET परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्याचा आणि गैरप्रकाराचा 'वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन'ने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषी यंत्रणेवर कठोर फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी युनियनच्या वतीने आज, शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजता कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
​युनियनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, NEET परीक्षा ही केवळ एक परीक्षा नसून ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची आणि कष्टांची जीवनरेखा आहे. मात्र, या परीक्षेत समोर आलेल्या भयंकर गैरव्यवहारामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा विदारक चेहरा समोर आला आहे. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेला विश्वासघात असून, यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
​या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, कोल्हापूर जिल्हा व शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून निवेदन सादर केले जाणार आहे. याप्रसंगी युनियनचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय गुदगे, यादवनगर शाखा अध्यक्ष तुळशीदास धनवडे, उपाध्यक्ष भिमराव कोरगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes