Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफ

जाहिरात

 

राज्य राखीव पोलीस वर्धापन दिनानिमित्त संचलन परेड सोहळा उत्साहात

schedule14 Mar 25 person by visibility 301 category

कोल्हापूर;  
         राज्य राखीव पोलीस बल वर्धापन दिन सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कल्याणकारी कार्यक्रम व महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ प्रशिक्षणार्थी  सत्र क्र. 66 - आय दीक्षांत संचालन परेड सोहळा नंदवाळ  परेड मैदान येथे समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर यांचे प्रमुख  उपस्थितीत  मोठ्या आनंदात पार पडला.
           महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या जवानांनी  परेडचे दिमागदार संचालन केले. 6 मार्चपासून पूर्ण आठवड्याभरात  डॉ. अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली  हर्ष फायर परेड, पोलीस पाल्य  व इतर शाळांच्या विद्यार्थ्यांच्या   धावण्याच्या स्पर्धां, शस्त्र प्रदर्शन, वाहतूक नियम कार्यशाळा, विद्यार्थ्यांकरिता करियर मार्गदर्शन, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बँड डिस्प्ले  पोलीस कुटुंबीय व  परिसरातील नागरिकांकरिता आरोग्य शिबिर, जवळच्या  गावांमध्ये स्वच्छता अभियान अशा विविध समाजउपयोगी कार्यक्रमांचे   आयोजन केलेले होते.
         समादेशक डॉ. प्रशांत अमृतकर यांची विद्यार्थ्यांबद्दल  व समाजाबद्दल सेवा करण्याची तळमळ या उपक्रमांमधून दिसून येत असल्याने पूर्ण करवीर कोल्हापूर वाशीयांकडून कौतुक केले जात आहे. 
         सदर सर्व कार्यक्रमाकरिता  सहाय्यक समादेशक  एस एन सदाशिव, पीआय अजय लिपारे, पीएसआय गेंगजे, पीएसआय  डोंगरे, पीएसआय पवार, पीएसआय गुजर तसेच राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 16 कोल्हापूर येथील सर्व पोलीस अधिकारी  व अंमलदारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असल्याने  पोलीस व सामान्य जनतेमध्ये एक सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes