+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
schedule17 Mar 24 person by visibility 100 category
 एक आठवण
लेखक: अर्जुन विष्णु जाधव पृष्ठ - १९६
प्रकाशक : शारदा प्रकाशन, ठाणे
मूल्यः २५०/-रूपये प्रथमावृत्ती : २८ सप्टेंबर २०२३

           'प्रेयसी - एक आठवण' ही कादंबरी एका तरुण-तरुणीची नितळ प्रेमाची ग्वाही देणारी कादंबरी आहे. या कादंबरीचा नायक दशरथ हा खेडेगावातून शहरात काकांकडे शिक्षण घेण्यासाठी आला आहे. शिक्षण घेता घेता 'कमवा व शिका' या योजनेचा तो भोक्ता आहे. दशरथच्या बाजुच्या घरात कल्पना ही कादंबरीची नायिका राहते. दशरथ चांगल्या मार्कानी पास होतो. त्याला पास झाल्याबद्दल आनंद साजरा करायला त्याच्याकडे पैसे नसतात. त्याला कल्पना मदत करते. कल्पना दशरथच्या प्रेमात पडते. या कादंबरीतून अर्जुन जाधव यांनी स्वच्छ, नितळ प्रेम कसे असावे याचा आदर्श वाचकांसमोर मांडला आहे. प्रेमातील निस्सीम एकनिष्ठपणा आणि त्याग या मुल्यांचा लेखकाने कादंबरीत आग्रह धरला आहे. वरवर प्रेमकथा वाटणाऱ्या कादंबरीत उच्च मानवी मुल्य काय असते, हे अर्जुन जाधव यांनी दाखवून दिले आहे. म्हणूनच कादंबरीतील कथानक वाचनीय व समाजाला नितळ प्रेमाचा संदेश देणारे देणारे आहे.
               'जागर', 'बेळगाव कुणाच्या बापाचं, 'माझा बाप-उद्ध्वस्त गिरणी कामगार', 'बागलकोटची सुगंधा' या साहित्यांची निर्मिती करत अर्जुन जाधव यांनी 'प्रेयसी... एक आठवण' ही आठवण' ही प्रेम या विषयाला वाहिलेली हलकी फुलकी कादंबरी लिहिली. 'प्रेयसी... एक आठवण' या कादंबरीतील भाषा सोपी व सहज आहे, वाचनीय आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेताना तरुण वर्ग म्हणजे मुलं-मुली भरकटताना दिसत आहेत. या कादंबरीतून तरुणवर्गाला चिंतन करता येईल आणि आपल्या चुका सुधारता येतील अशी आशा लेखकाला आहे.
                दशरथ मुंबईमध्ये काकांकडे राहतो आणि पेपरची लाईन टाकतो. कष्ट करत तो दहावी चांगल्या मार्कांनी पास होतो. नंतर कॉलेजला अॅडमिशन घेण्यासाठी कल्पनाची आई त्याला आर्थिक मदत करते. अर्थात, दशरथ त्याच्या कमाईतून हे पैसे कल्पनाच्या आईला देणार आहे. परंतु संकटकाळी देव धावून यावा, तशी कल्पनाची आई दशरथला मदत करते. दशरथ आर.जे. कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतो. दशरथ हा साहित्यिक, कवी आहे. त्यामुळे कल्पनाची शिक्षिका असलेली आई दशरथला शिक्षणासाठी प्रोत्साहन देते.
               दशरथ आणि कल्पनाचे प्रेम प्रकरण सुरु होते. दशरथ कवी मनाचा आहे आणि तो आपल्या परिस्थितीचा विचार करून गंभीरपणे वागतो. कल्पना स्वछंदी, मनमोकळी आहे. तिच्याबद्दल दशरथ एक चारोळी लिहीतो.
'मी ओळखून आहे.
तुझ्या हृद‌यातील डाव
शेवटी तुझे अन् माझे
एकच ते प्रेमाचं गाव... '
               दशरथच्या काव्यपंक्तीने कल्पनाच्या हृदयावर घाव मारला. या काव्यपंक्ती तिच्या हृद‌यात खोलवर रुतून बसल्या. त्यानंतर कल्पना दशरथच्या प्रेमात बुडाली. दशरथने प्रेमापेक्षा शिक्षण व कर्तव्याला महत्व दिले होते आणि कल्पनाने शिक्षणासोबत दशरथवर प्रेम करायला प्राधान्य दिले होते. दशरथ रात्रपाळी करत काम करतो आणि दिवसाला शिक्षण घेतो.
              दशरथ कॉलेजमध्ये शिक्षण घेताना कल्पना त्याच्यावर प्रेम करत आहे. दशरथला मनापासून कल्पनावर प्रेम करायचे आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. म्हणूनच दशरथला काव्यपंक्ती सुचतात.
'माझी कल्पना हृदयाची
हृदयात दाटलेल्या शब्दाची,भावनांची
उचंबळून येणाऱ्या प्रेमरंगाची...'
              दशरथचे कॉलेज लाईफ सुरू होते. लेखक अर्जुन जाधव यांनी कॉलेज जीवनातील युवक-युवतींच्या प्रेमातील बारकावे 'प्रेयसी...एक आठवण' या कादंबरीत खुबीने मांडले आहेत. कॉलेज जीवनात अल्लड प्रेम होते, नंतर प्रेमातील खरे स्वरूप समजते. त्यामुळे प्रेम ही भावना नितळ व पारदर्शक असावी, अशी अपेक्षा लेखक अर्जुन जाधव व्यक्त करतात. अर्जुन जाधव यांनी लिहिलेली कादंबरी 'प्रेयसी... एक आठवण ' ही त्यामुळेच भरकटलेल्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करते. अर्जुन जाधव हे मूळचे कवी व साहित्यिक आहेत. त्यापेक्षा त्यांना समाजभान आहे. त्यांचा पिंड सच्चा समाजसेवकाचा आहे. कारण त्यांनी आपल्या लिखाणा‌रे सामाजिक जागृती केली आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे 'प्रेयसी... एक आठवण' ही कादंबरी त्यांनी प्रेमकथा म्हणून लिहिली असली तरी कथेतील नायिका एक समाजसेविका, मार्गदर्शक दाखवली आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ चित्रकार अशोक सुतार यांनी केले आहे. समुद्रासारखे विशाल मन असणाऱ्या युवक- युवतीच्या प्रेमकथेचे चित्रण अशोक सुतार यांनी मुखपृष्ठा‌द्वारे केले आहे.
              'प्रेयसी... एक आठवण' ही फक्त प्रेमक‌था आहे असे नव्हे तर समाजातील मानवी मुल्यांना गवसणी घालणारी, युवकांना समाजभान प्राप्त करून देणारी ध्येयवादी विचारांची कादंबरी आहे. लेखक अर्जुन जाधव यांनी या प्रेमकथेत खुबीने सामाजिक समस्या मांडल्या आहेत. या कादंबरीत समाजात सुरु असलेल्या उथळ प्रेमाला त्यांनी महत्व दिलेले नाही तर नितळ, पारदर्शी प्रेमाचा आग्रह वाचकांसमोर मांडला आहे. तसेच ही कादंबरी मानवी मूल्यांना सलाम करते. मानवतेचा जयघोष करते. यामुळे 'प्रेयसी... एक आठवण' ही कादंबरी मानवी मूल्य जपणारी, जबाबदारीची जाणीव करून देणारी, सामाजिक उत्थानाला महत्व देणारी ठरते. तसेच कादंबरीतील चटकदार संवादामुळे ती क्लिष्ट न होता वाचनीय झाली आहे. एका संवेदनशील लेखकाची मानवी मूल्यांना गवसणी घालणारी उत्कृष्ट कादंबरी असा उल्लेख 'प्रेयसी... एक आठवण' या कादंबरीचा करावा लागेल.
       - अशोक सुतार
          मराठी भाषा अभ्यासक
         ८६००३१६७९८