वनविभागाचे दोन मेल; शेकडो विद्यार्थी फेल
schedule14 Feb 24 person by visibility 263 categoryगुन्हे
युवराज राजीगरे-चुयेकर:-
कोल्हापूर :
कोल्हापूर वनविभागाकडून वनरक्षक पदासाठी भरती सूरू आहे. परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी आज बोलवण्यात आले होते. या विभागाकडून दोन दोन लिस्ट प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण झाला व अनेकांना या पदापासून दूर राहावं लागलं.यामुळे त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली होती.
वनविभागाकडून प्रसिद्ध झालेली जुनी लिस्ट व नवीन लिस्ट मधील फरकामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत योग्य ठिकाणी कागद पत्र पडताळनी साठी जाता आले नाही. जुन्या नंबर प्रमाणे पडताळण्यासाठी गेल्या नंतर त्या विद्यार्थ्याला कळतं की तुमचा नंबर नविन मेरिट लिस्ट प्रमाणे कोल्हापूर मध्ये नाही तर साताऱ्यात आला होता. पण ती तारीख निघून गेली आहे. नविन तारीख जुन्या तारखेच्या अगोदर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.वनविगाकडून या गोष्टीची दखल घेऊन वंचित विद्यार्थ्यांना परत एकदा कागदपत्र पडताळणी साठी वेळ द्यावा अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.
वनविभागाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून सुद्धा दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी मध्ये अनेक विद्यार्थ्यांना धक्काच बसला. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन मेल आलेत पहीला मेल आला तो परीक्षा क्रमांकावरून पडताळणी केंद्र दिलं त्याची तारीख थोडी उशीराचीच दिली होती. आणी नंतर वनविभागाने हुशारीने नवीन मेल पाठवला तो पडलेल्या मार्कांच्या मेरिट प्रमाने नंबर देऊन पाठवला होता. पण तारीख थोडी अगोदरची. त्याची कल्पनाच विद्यार्थ्यांना नव्हती पण 14 तारखेला म्हणजे आज आपला नंबर लागेल. या आशेवर अनेक विद्यार्थी सकाळी आठ वाजल्यापासून भर उन्हात उभे होते. काही वेळाने अधिकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांकडून कागदपत्र पडताळणीस गैर हजर रहाण्याचे कारण तक्रार अर्ज स्वरुपात लिहून घेतले. व परत सर्व विद्यार्थ्यांना संध्याकाळपर्यंत ताटकळत उभा करण्यात आले व तद्नंतर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत मेल वर कळवण्यात येईल. पण तत्पूर्वी विद्यार्थ्यी व पालक अधिकार्यांना हाच प्रश्न विचारत होते. कि तुम्हाला मेरिट प्रमाणेच कागदपत्र पडताळणी करायची होती. तर पहिला मेल का पाठवलात? जो चुकीचा होता . आणी त्यामुळे झालेल्या संभ्रमाने अनेक विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची सावली कायम आहे. समंदीत अधिकाऱ्यांनी या संभ्रमाची दखल घेऊन. वंचित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पालक व विद्यार्थ्यी वर्गातून होत आहे.