वर्षा शिवाजीराव कांबळे यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'
schedule06 Mar 25 person by visibility 160 categoryराजकीयसामाजिक

वर्षा शिवाजीराव कांबळे यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'
कोल्हापूर
इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील वर्षा शिवाजीराव कांबळे यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
कांबळे या 7 वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे . इंचनाळ येथे 2015 पासून ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम करतात. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेमध्ये महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांना सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करायची आवड आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.