Awaj India
Register
Breaking : bolt
अन्यायाला न जुमानणारे बंडखोर नेतृत्व : भावी आमदार सत्यजित उर्फ नाना कदमआठवणींचा ओलावा… शब्दात न मावणारी पोकळीकोल्हापुरात अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई; शरीरास घातक इंजेक्शन आणि गांजासह दोघे ताब्यातइचलकरंजीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; सव्वा दोन लाखांच्या गांजासह दोघे जेरबंदशिवसेना समन्वयक सत्यजित (नाना) कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमकामगिरी दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ जि.प प्रशासनाला इशाराडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत प्रथमशिक्षकांच्या कमतरतेवर जिल्हा परिषद सदस्यांचा मदतीचा हातके. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*

जाहिरात

 

आठवणींचा ओलावा… शब्दात न मावणारी पोकळी

schedule03 May 26 person by visibility 75 categoryशैक्षणिक

कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी 

कै. प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादनासाठी शोकसभा
कोल्हापूर (प्रतिनिधी) – एका संवेदनशील, विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि शिक्षणाला संस्कारांची जोड देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा अचानक अंत… ही केवळ एक दुःखद घटना नाही, तर असंख्य मनांना पोकळी देणारा वेदनादायी क्षण आहे. कै. प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या निधनाने कोल्हापूरसह संपूर्ण शैक्षणिक विश्व शोकमग्न झाले आहे.
दि. ३० एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या अकाली जाण्याने प्रत्येकाच्या मनात वेदनेचा डोंगर साचला आहे. अजूनही त्यांच्या आठवणी, त्यांचा हसरा चेहरा, विद्यार्थ्यांबद्दलची आपुलकी आणि सहकाऱ्यांशी असलेला जिव्हाळा डोळ्यांसमोर तरळत आहे… आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओलावून जात आहेत.
या दुःखद प्रसंगानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार, दि. ०४ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही केवळ एक औपचारिक सभा नसेल… तर प्रत्येकाच्या मनातील भावना, आठवणी आणि कृतज्ञतेचा एक ओलावा असेल. ज्या व्यक्तीने आयुष्यभर इतरांना उभं केलं, त्यांच्यासाठी आज सगळे एकत्र येऊन अश्रूंनी नतमस्तक होणार आहेत.
या शोकसभेस उपस्थित राहून कै. गावडे मॅडम यांच्या स्मृतींना अभिवादन करावे, असे आवाहन संस्थेच्या सहसचिवांकडून करण्यात आले आहे.
आज त्या आपल्यात नाहीत… पण त्यांनी दिलेली शिकवण, संस्कार आणि प्रेरणा कायम जिवंत राहतील… आणि प्रत्येकाच्या मनात एकच भावना उमटत राहील—
“माणूस जातो… पण त्याच्या आठवणी कधीच संपत नाहीत…”

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes