Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागरडि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन* डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

हिंदी निबंधलेखन,मराठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

schedule11 Aug 23 person by visibility 831 categoryशैक्षणिक




कोल्हापूर : (आवाज इंडिया)
पंडित जवाहरलाल नेहरु शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य कै.बाळकृष्ण विष्णू वडेर यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय हिंदी निबंधलेखन आणि मराठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन कैले आहे. जय हनुमान हाय. व बा. वि.वडेर ज्युनिअर कॉलेज इस्पुर्ली प्रशालेत या स्पर्धा होणार आहेत.
        ही स्पर्धा इ.५वी ते इ.१० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात ठेवण्यात आलेली आहे.प्रत्येक गटासाठी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंलेखन व वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हावे.
गुरुवारी (दि.17) जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहेत. पाचवी ते सातवी या लहान गटात स्पर्धेसाठी वेळ ५ मिनिटे असणार आहेत. यासाठी 
१.बदलत्या शिक्षणव्यवस्थेत पालकांची भूमिका.
२. फॅशनमध्ये हरवली आईच्या पदराची ऊब
३. राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि सामाजिक क्रांती
४.पर्यावरण संवर्धन :काळाची गरज
५. खरच! स्त्री पुरुष समानता आहे का? 
 असे विषय आहेत.

      मोठा गट (इ.८ वी ते १० वी) या विद्यार्थ्यांच्या साठ वेळ ६ मिनिटे असणार आहे.  
मोठ्या गटासाठी विषय 
१. मानवता धर्म हरवतो आहे !
२. सोशल मिडियाच्या चक्रव्यूवहात भारतीय तरुणाई .
३. भारतीय अर्थव्यवस्था काल
     आज आणि उद्या.
४. शेतकऱ्यांपुढील आव्हाने.
५. छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी. 

********* बक्षिसे ***********
प्रथम १००१,व्दितीय ७०१,तृतीय ५०१ 
 रोख ,प्रमाणपत्र,व स्मृतिचिन्ह
============================
(वक्तृत्व स्पर्धा २३इ.रोजी सकाळी ९.०० वाजता शालेय सभागृहात होतील.)
============================
******* हिंदी निबंधलेखन स्पर्धा *******
          लहान गट (इ.५ वी ते ७ वी)
        शब्दमर्यादा ५०० ते ७०० शब्द
*********** विषय ***********
१. लडका लडकी एक समान
२. जीवन में क्रिडा का महत्व
३. अंतरिक्ष में भारत
४. पेड पौंधों का महत्व
५. परिश्रम ही सफलता की कुंजी है|

*मोठा गट (इ.८ वी ते १० वी )
*********** विषय ************
१. बेरोजगारी की समस्या
 
२. कर्म ही पूजा हैं |
            
३.भारत : एक सांस्कृतिक देश 
   
४. मेरा प्रिय कवि 
      
५. स्वास्थ्य ही सच्ची संपत्ति है |
========================
********** बक्षिसे **********
प्रथम ५०१,व्दितीय ३५१,तृतीय २५१ रु.प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह.
============================
         निबंध पत्रव्यवहारासाठी पत्ता:
मुख्याध्यापक,
जय हनुमान हाय.व बा.वि.वडेर ज्युनि. कॉलेज इस्पुर्ली ता.करवीर जि.कोल्हापूर.
============================
                    स्पर्धेचे नियम
१.वक्तृत्वासाठी प्रत्येक प्रशालेतून लहान गट व मोठा गट प्रत्येकी एक असे दोनच स्पर्धक सहभागी होतील.
२. हिंदी निबंध २५ ऑगस्टपर्यंत आमचे कार्यालयात विद्यार्थ्यांच्या आयडेंटीसाईज फोटोसह पाठवावा.

३..स्पर्धेचा निकाल आपणास कळविणेत येईल.बक्षिसे रविवार दि.०३.०९.२०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता जय हनुमान हाय.व बा.वि.वडेर ज्युनि. कॉलेज इस्पुर्ली स्मृतिदिन कार्यक्रमावेळी प्रदान करणेत येतील.

४. पंचाचा निर्णय अंतिम असेल.

५. स्पर्धेचा निकाल फोन किंवा Whatsapp वरुन कळवला जाईल.
६.प्रत्येक शाळेतून लहान व मोठ्या गटातून एका विद्यार्थ्यांला असे दोनच स्पर्धक सहभागी होतील .

७. दिनांक ३ सप्टेंबर रोजीच बक्षिसे घेऊन जाणे. त्यानंतर बक्षीस दिले जाणार नाही.
संपर्क:
९४०४९७३६९३,
९०७५०२२५९९
९२८४६४९४४९
९६०४११७४००

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes