Awaj India
Register
Breaking : bolt
कामगिरी दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ जि.प प्रशासनाला इशाराडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत प्रथमशिक्षकांच्या कमतरतेवर जिल्हा परिषद सदस्यांचा मदतीचा हातके. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;

जाहिरात

 

नागपूरच्या महिला दूध उत्पादकांची ‘गोकुळ’ ला भेट...

schedule27 Sep 24 person by visibility 1062 categoryलाइफस्टाइल


कोल्‍हापूर,ता.२७: नागपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत नागपूर येथील १०० महिला दूध उत्पादक शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी आले असता त्यांनी आज कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मुख्य दुग्ध प्रकल्पास गोकुळ शिरगाव येथे भेट दिली.

          यावेळी त्यांनी गोकुळच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन तेथील व्यवस्थापन, संकलन, प्रक्रिया, उत्पादन, पॅकिंग याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान, गोकुळ दूध संघाचे व्‍यवस्‍थापन व कामाची पद्धत पाहून महिला शेतकरी भारावून गेल्या. गोकुळमार्फत दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, दूध खरेदी दर याची सविस्तर माहिती देण्यात आली. अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला दूध उत्पादक शेतकरी यांनी गोकुळ राबवित असलेल्या दूध उत्पादकांच्या हिताच्या अनेक योजनेचे व खास करून जनावरांच्या वरील आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे त्यांनी कौतुक करून गोकुळने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली प्रगती दूध उत्पादकांच्या उत्कर्षाला चालना देणारी असल्याचे हे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या महिला शेतकऱ्यांचे स्वागत केले व दुग्ध व्यवसायाविषयी चे सखोल मार्गदर्शन गोकुळ निश्चितच करेल असे आश्वासन दिले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक किसन चौगले, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत, जिल्हा परिषद नागपूर कृषी व पशुसंवर्धनचे सभापती प्रविण जोध, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रवीण नागरगोजे, पशुधन विकास अधिकारी डॉ.शकील अगवान, डॉ. राधा भोईटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, महिला अधिकारी गीता उत्तुरकर, तृप्ती मदने व दूध उत्पादक महिला व संघाचे अधिकारी उपस्थित होते.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes