...तर राजेश क्षीरसागरांचा प्रचारक मी असेन; धनंजय महाडिक
schedule26 Oct 24 person by visibility 271 categoryराजकीय

कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाबाबत संभ्रमावस्था निर्माण होत आहेत. भाजपकडून सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासाठी उमेदवारी मिळावी, म्हणून मी मुख्यमंत्री यांना भेटलो. तरीही राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाल्यास मी त्यांचा प्रचारक असेन असे स्पष्ट मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर उत्तर बाबत कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. खासदार महाडिक यांनी कृष्णराजसाठी उमेदवारी मागितली. सत्यजितसाठी नाव घेतलं नाही अशी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत महाडिक यांनी खुलासा केला.
खासदार महाडिक म्हणाले, मुख्यमंत्री यांच्याकडून कृष्णराज महाडिक यांची विचारणा झाली. त्यावेळी कृष्णराज हा लोकप्रिय आहे. त्याचा युवा वर्ग मोठा आहे. त्याला उमेदवारी मिळाल्यास तो नक्की यश मिळेल असं मी सांगितलं. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळावी, यासाठी मी गेलो होतो असेही महाडिक म्हणाले.
क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याकडून उत्तर बाबत योग्य भूमिका घ्यावी अन्यथा दक्षिणमध्ये दबाव तंत्राचा वापर करू असं सांगण्यात आलं. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी अशी विधान करणे चुकीचे आहे महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सर्वांनी करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं.