+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule28 Sep 20 person by visibility 780 categoryसंपादकीय
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अभय अरविंद देवरे व पत्नी सौ पूनम अरविंद देवरे आपल्या कुटुंबासमवेत रहातात. देवरे कुटुंबाचा वडिलोपार्जित व्यापार आहे. करोनाचा महाप्रकोप सुरू असतानाच सौ पूनम यांचा वाढदिवस आला. पत्नीचा वाढदिवस म्हणून पतीसाठी स्वर्गिय आनंदाचा क्षण असतो. तर मुलांना आपल्या आईचा वाढदिवस म्हणून उत्साह ओसांडून वहात असतो. करोनाच्या संकटामुळे या वाढदिवसाचा आनंदावर पाणी पडले
सौ पूनम यांच्या वाढदिवसाचा खर्च साधारणपणे लाखभर रूपये होत असे. समाजातील लोक करोनाशी सामना करत असताना आपण आनंद साजरा करणे अयोग्य व संवेदनाशून्य वाटल्याने अभय देवरे यांनी पत्नींच्या वाढदिवसासाठी होणारा एक लाख रूपये खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान करून आपले समाजाप्रति असणारे प्रेम दाखवून दिले.एक लाख रूपयांचा धनादेश अभय देवरे व पत्नी सौ पूनम देवरे यांनी यावल तालुक्याचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांचेकडे सुपूर्द केला
सौ पूनम यांचे कौतुक एवढ्यासाठी वाटते की त्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला होता.एक लाख रूपये ठेव ठेवता आली असती. किमान दोन तोळ्याचा दागिणा करता आला असता.अथवा करोना संसर्ग थांबल्यावर मुलांसह एखादी सहल करता आली असती. वरील सर्व पर्याय असताना लाख रूपये दान करणे सोपी गोष्ट नव्हती. तरीही सौ पूनम यांनी पतीच्या विनंतीचा मान राखून मनापासून समाजासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला
समाजात फार थोडे लोक असे आहेत की स्वत:च्या आनंदाचा त्याग करून दुसऱ्याला मदत करत आहेत. समाजात काही लोक मदत करायचे सोडाच,पण पगार मिळत असूनही समाज करोनाने होरपळून निघत असताना लाच घेतात यासारखे समाजाचे ,देशाचे दुसरे दुर्दैव नाही
अभय देवरे व सौ पूनम देवरे आपणास वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. तुम्हा दोघांना व सर्व कुटूंबास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ,ही परमेश्वराचे चरणी प्रार्थना.यावल तालुका तुमच्या दातृत्वास नक्कीच सलाम करेल
संपत गायकवाड -(माजी सहा. शिक्षण संचालक)