+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule18 Apr 23 person by visibility 159 categoryराजकीय
 विधान परिषदेबाबत मोठा गौप्यफोस्ट*

कोल्हापूर : आवाज इंडिया प्रतिनिधी

राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता रंगू लागला आहे. सत्ताधारी सहकार आघाडीची विजय निर्धार सभा आज हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात झाली. विशेष म्हणजे या सभेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक,माजी आमदार अमल महाडिक, राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे चिरंजीव आदित्य पाटील यड्रावकर, जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले असे जिल्ह्यातील मातब्बर साखर कारखान्यांचे प्रमुख उपस्थित होते. आमदार विनय कोरे यांनी बोलताना आपला संपूर्ण राजकीय प्रवास उलगडून दाखवला. राजकारणात आलेले बरे वाईट अनुभव सांगताना त्यांनी दिलखुलास संवाद साधला. राजाराम कारखाना निवडणुकीत सत्ताधारी सहकार आघाडी सोबत का आलो? याचा खुलासा करताना कोरे म्हणाले, विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यावेळी माझ्या घरात मी,नामदार चंद्रकांत दादा पाटील,उद्योगपती संजय पाटील आणि बंटी पाटील यांची बैठक झाली. त्या बैठकीत संजय पाटील आणि बंटी पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्यास आम्ही राजाराम कारखाना बिनविरोध करू असा शब्द मला दिला होता. त्यानुसार मी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देत विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध केली. बंटी पाटील आमदार झाले, त्यानंतर मंत्री झाले आणि नैतिकता विसरले. राजाराम कारखाना सभासद अपात्रता प्रकरणात वेळी मी त्यांना त्यांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली होती. पण दुर्दैवाने बंटी पाटलांची शब्द फिरवण्याची वृत्ती समोर आली. त्यांनी विश्वासघात करून राजाराम कारखान्याची निवडणूक सभासदांवर लादली आहे. पण मी महाडिकांना दिलेला शब्द पाळणार आहे.त्यामुळे आज मी या व्यासपीठावर आहे. माझ्यासोबत संपूर्ण वारणा परिवार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते सत्तारूढ सहकार आघाडीच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करतील असा विश्वास विनय कोरे यांनी व्यक्त केला. निवडणुका येतात जातात पण नैतिकता एकदा गेली की गेली असे शब्दात त्यांनी सतेज पाटील यांना सुनावले. खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांनी लादलेली ही निवडणूक आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास व्यक्त केला. केवळ विरोधाला विरोध करण्याचे राजकारण करणाऱ्यांनी आता पराभवाची तयारी ठेवावी असा टोलाही महाडिक यांनी लगावला. यावेळी कुंभोजच्या सरपंच जयश्री जाधव,माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, बाबासाहेब पाटील, अरुण पाटील, शंकरराव पाटील, उत्तम पाटील, शिवाजीराव पाटील ,अशोकराव माने ,दिलीप पाटील, सुरेश पाटील, भास्कर शेटे, राजकुमार भोसले,अनिकेत चौगुले यांच्यासह विविध मान्यवर,राजाराम कारखान्याचे सभासद, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.