+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन adjustगद्दार खासदाराला कायमचे घरी बसवा adjustसतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून भाजपप्रवेश ; नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी adjustआमच्या विरोधकांनी आता किमान अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी adjustविकासकामांच्या आडवे याल तर याद राखा ; कसबा बावड्याचा विकास हेच शिवसेनेचे ध्येय adjustमंडलिक यांनी 27 पैसे तरी कोणाला देऊन माहिती आहेत का? adjustजनतेला फसवत विश्वासघात, गद्दारी करणाऱ्या संजय मंडलिकांना पराभूत करा
schedule21 Apr 24 person by visibility 60 category



 प्रचार सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद, विविध संघटना, संस्थांनी जाहीर केला पाठिंबा

 राधानगरी : “छत्रपती कुटुंबीय आणि राधानगरी परिसर यांच्यामध्ये एक वेगळे नातं आहे. शाहू छत्रपतींची उमेदवारी ही रयतेने आपली उमेदवारी मानली आहे. राधानगरीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते राजकारण बाजूला ठेवून शाहू छत्रपतींच्या विजयासाठी एकवटले आहेत. त्यांचा विजय निश्चित असून राधानगरी तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळेल,’ असा विश्वास गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी व्यक्त केला.
इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ फेजिवडे (ता. राधानगरी) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेला विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी विविध संघटनांनी शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला.
अभिजीत तायशेटे पुढे म्हणाले, ‘राधानगरी परिसराच्या विकासासाठी छत्रपती कुटुंबीय नेहमी प्रयत्नशील आहेत. पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेपासून पर्यटन वृद्धीपर्यंत सहकार्य आहे. शाहूंची उमेदवारी जनतेने आपली मानली आहे. याचे प्रत्यंत्तर संपूर्ण तालुक्यातील प्रचार दौर्‍यात आले. गावेच्या गावे त्यांच्या पाठीशी आहेत. पाठिंबा देत आहेत. सर्वपक्षीय कार्यकर्ते राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या विजयासाठी काम करत आहेत.’
जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील म्हणाले, ‘लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्वाची आहे. देश संकटाकडे वाटचाल करत आहे. या स्थितीत समाजहिताला प्राधान्य देत शाहू छत्रपती निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कारखाना निवडणूक हे सारे बाजूला ठेवून सर्वांनी शाहू छत्रपतींना मतदान करण्याचे ठरविले आहे.
याप्रसंगी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, सुधाकर साळोखे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, वंचित बहुजन आघाडीचे दयानंद कांबळे, सरपंच प्रतिभा कासार, माजी सरपंच फारुक नावळेकर, उत्तम पाटील, दादासो सांगावकर आदी उपस्थित होते.



भाजपा सरकार सत्तेवर आले तर निवडणुकाच होणार नाहीत

जिल्हा परिषद सदस्य शिवानंद माळी म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचा कारभार हा हुकुमशाही पद्धतीचा आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. 400 पारची घोषणा ही संविधान बदलण्यासाठी आहे हे भाजपवालेच सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप जिंकली तर कोणत्याच निवडणुका होणारच नाहीत.



दुर्गमनवाड, पडसाळी गावांचा शाहू छत्रपतींना एकमुखी पाठिंबा
दरम्यान, शाहू छत्रपती यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड व पडसाळी येथील ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी तळगाव, दुर्गमनवाड व पडसाळीसह वाड्या-वस्त्यांना भेटी देत संपर्क दौरा केला. यावेळी दोन्ही गावांतील सर्व मतदान हे शाहू छत्रपतींनाच करणार असल्याची घोषणा दोन्ही गावांतील प्रमुख मंडळींनी एकत्र येत मालोजीराजे यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत केली.
दुर्गमनवाड जवळील गैबी देवस्थान जवळ दोन्ही गावांतील प्रमुख मंडळींनी मालोजीराजे छत्रपतींची भेट घेतली. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे, राजाराम कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळोखे, पंचायत समितीचे माजी सभापती मोहन पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेश चौगले, उत्तम पाटील, विश्‍वास राऊत, रमेश बचाटे, संतोष पाटील आदींसह दोन्ही गावच्या सरपंच अर्चना कांबळे व कविता शेळके तसेच तानाजी पाटील, कृष्णात पाटील, विश्‍वास नाके, अंकुश जिनगरे, उपसरपंच बंडोपंत पाटील, अंकुश पाटील, सुरेश हारुगले आदी उपस्थित होते. 
यानंतर छत्रपती मालोजीराजे यांनी भुजंग पाटीलवाडीसह राधानगरी तालुक्याच्या पश्चिम डोंगरी भागातील वाड्या-वस्त्यांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला व अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी अखंडपणे प्रयत्नशील राहू असे सांगितले.