+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या* *१९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड* adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ
schedule30 Apr 24 person by visibility 51 category
...संजय मंडलिक 
                
बानगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री येथे जाहीर सभा
             
बानगे, दि. २९: ' आमच्या विरोधकांनी आता किमान अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी. अशी कोपरखळी प्रा. संजय मंडलिक यांनी लगावली. 
लोकसभेसाठी महायुतीकडून मिळालेली उमेदवारी हा कागलचा गौरवच आहे. त्यामुळे कागलचा सुपुत्र म्हणून मला मताधिक्य द्या, असे आवाहनही महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले.
               
कागल तालुक्यातील बाणगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री येथे आयोजित जाहीर प्रचार सभांमध्ये प्रा. मंडलिक बोलत होते. बाणगे येथे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संपत पाटील होते.
प्रा. मंडलिक म्हणाले, घटना बदलण्याबाबत विरोधक कांगावा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र; चंद्र- सूर्य असेपर्यत ही घटना कायम राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षात भारत देशाला विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विरोधी उमेदवारांपेक्षा त्यांचे प्रवक्तेच जास्त बोलायला लागलेत. आम्हाला जातीयवादी म्हणून हे हिणवणाऱ्या या प्रवक्त्यांचे पुरोगामीत्व सोयीनुसार आहे. मागील निवडणुकांमधील भूमिकांबाबत त्या प्रवक्त्यांनी उत्तरे द्यावीत.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांनी कागलच्या जनतेच्या हितासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्याबाबत आपण कृतज्ञता म्हणून आणि त्यांचा पांग फेडण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देवूया. कागल तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य हाच प्रा. संजय मंडलिक यांचा विजय ठरेल. त्यामुळे एक -एक मतासाठी संघर्ष करा. लोकनेते खासदार स्वर्गीय कै. सदाशिवराव मंडलिक यांनी वेदगंगा काठाचे खोरे काळम्मावाडी धरणाच्या सिंचन आराखड्यामध्ये नसतानाही या भागाला पाणी दिले. त्यामुळे साडेसहा हजार हेक्टर होऊन अधिक जमीन ओलिताखाली आली.
                       
...मग अर्ज दाखल करण्यासाठी एकही नेता का नाही?
माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहिले. मात्र; गादीचा सन्मान राखण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचा एकही नेता उपस्थित राहिलेला नाही. तर माझ्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे मी भाग्यवान असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले.
               
यावेळी शेखर सावंत, सुभाष चौगुले, राजू पाटील, धनाजी पाटील यांचीही मनोगते झाली. संतराम पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक भगवान पाटील यांनी केले. अमोल सावंत यांनी आभार मानले.