+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना adjustडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल १०० टक्के* adjust*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या* *१९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड* adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव.
schedule30 Apr 24 person by visibility 83 categoryराजकीय

संजय घाटगे यांचा सवाल

कसबा सांगाव येथील प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद; सध्याच्या सत्ताधार्‍यांनी महाराष्ट्राला 50 वर्षे मागे नेले : संभाजीराजे 

 

कसबा सांगाव : वार्ताहर

शाहू छत्रपतींनी काय काम केले असा सवाल करणार्‍यांनी राधानगरी तालुक्यातील परिते येथे जाऊन शाहू छत्रपतींनी 27 एकर दिलेली मोफत जमीन बघून यावी. तुम्हाला 27 पैसे तरी कोणाला देऊन माहिती आहेत का? तुमचे व्यक्‍तिगत आचरण काय? तुमची विचारधारा काय? तुमचे काम काय? आणि ते सोडून नको ती बडबड कशाला करता? अशी प्रश्‍नांची सरबत्ती असा माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी खासदार संजय मंडलिक यांचे नाव न घेता केली. 

कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजयबाबा घाटगे पुढे म्हणाले, जातीपातीचे राजकारण निर्माण करायचे व अल्पसंख्याकांचा द्वेष करायचा आणि बहुजनांकडून मताची अपेक्षा ठेवायची, एवढेच काम भाजप करीत आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांशी तर यांचे काहीच देणेघेणे नाही. तसे असते तर एक लाख शेतकर्‍यांना भूमिहीन करणारा शक्‍तीपीठ महामार्ग या भाजप सरकारने आणलाच नसता. म्हणूनच शेतकर्‍याची बाजू उचलून धरायची झाल्यास शाहू छत्रपती यांच्याशिवाय पर्याय नाही.

संभाजीराजे म्हणाले, कागल हे राजकीय विद्यापीठ असले तरी त्याला वैचारिक विद्यापीठ बनवावयाचे आहे. येथील लोकांची एकच खंत आहे की, निवडून दिलेला माणूस त्यांना पुन्हा भेटत नाही. शिक्षण, जातीव्यवस्था, महिला सबलीकरण यांच्या माध्यमातून ज्या राजर्षी शाहू छत्रपतींनी पन्‍नास वर्षे पुढे नेऊन ठेवले होते, त्याला सध्याच्या राजकारणांनी 50 वर्षे मागे नेले आहे. राजकारणात नीतिमत्ता राहिलेली नाही. खालच्या पातळीवर राजकारण केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरही टीका झाली. हे दुर्दैव आहे.

प्रभाकर आवळे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष धनंजय सेनापतीकर, रवींद्र कांबळे, शिवानंद माळी, सागर कोंडेकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी भोकरे आदींनी आपले मनोगत व्यक्‍त केले. यावेळी शिवगोंडा पाटील, आण्णासाहेब चौगुले, धनराज घाटगे, विक्रमसिग माने, रंगराव पाटील, दीपक चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बाबुराव शेवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार दयानंद स्वामी यांनी मानले.


 

गद्दार आणि बेन्टेक्स मंडलिक 

 

संभाजी भोकरे म्हणाले, स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी हमीदवाडाच्या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माझा मुलगा संजय याला सांभाळून घ्या असे म्हटले होते आणि लगेच उद्धव ठाकरे यांनी त्यांना मान देत संजय मडलिकांना खासदार केले. हेच संजय मंडलिक दुसर्‍याला बेन्टेक्स म्हणत होते. पण नंतर स्वतःच ‘खोक्या’मुळे बेन्टेक्स झाले. अशा गद्दार खासदाराला या निवडणुकीत गाडायची गरज आहे.