+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना adjustडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल १०० टक्के* adjust*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या* *१९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड* adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव.
schedule30 Apr 24 person by visibility 108 category

सतेज पाटींल

कोल्हापूर : ’गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ या सुत्रानुसार निवडून आलेल्या खासदार संजय मंडलिकांनी पाच वर्षात
मतदारांशी प्रतारणा केली. मतदारसंघाशी संपर्क नाही. विकासकामांचा पत्ता नाही. व्यक्तीगत स्वार्थ साधणाऱ्या जनतेला फसवणाऱ्या गद्दारी आणि विश्वासघात करणाऱ्या मंडलिकांना यंदाच्या
निवडणुकीत पराभूत करा आणि समतेचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना निवडून
द्या.’असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केल.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ साई मंदिर, कळंबा येथे जाहीर सभा झाली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत,
राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा झाली. आमदार सतेज पाटील यांनी भाषणात इंडिया आघाडीच्या
वचननाम्यातील विविध तरतुदी सांगतिल्या. ते म्हणाले, ‘सध्याच्या गढूळ वातावरणात चांगल्या विचारांचे व्यक्तीमत्व राजकारणात आवश्यक
आहे. शाहू छत्रपती यांच्यासारखे कर्तृत्ववान नेतृत्व दिल्लीला पाठवू. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर पहिल्यावर्षी तीस लाख सरकारी
नोकऱ्या देऊ. अग्निवीर योजना बंद करू. ”
राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील म्हणाले, ‘भाजपा सरकारचा कारभार हा शेतकरी, तरुण आणि महिला विरोधी आहे. शेतकऱ्यांना
आतंकवादी ठरविण्याचे कारस्थान भाजपाने केले. शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही, पण भाजपाने उद्योगपतींची कर्जमाफी दिली. बडया
भांडवलदारासाठी काम करणारे हे सरकार परत निवडून आले तर शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामावर फुललेला गोकुळ दूध संघालाही अडचणीत
आणू शकेल. अमूलच्या फायद्यासाठी ही मंडळी गोकुळची अवस्था महानंदसाखी करतील. देशावर सध्या हुकूमशाहीचे संकट ओढावले
आहे. अशा कठीण काळत लोकशाहीच मूल्ये अभेद्य राहिली पाहिजेत, प्रतिगामी शक्ती फोफावू नयेत यासाठी शाहू छत्रपती निवडणुकीच्या
मैदानात उतरले आहेत. त्यांच्या उमेदवारीने महाराष्ट्राला व देशाला नवी दिशा मिळाली आहे. त्यांना पाच लाखाहून अधिक मताधिक्यांनी
निवडून देण्याची साऱ्यांची जबाबदारी आहे. ’
उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले, ‘देशात सध्या अघोषित आणीबाणीसारखी स्थिती आहे. तेव्हा समस्त देशवासियांनी एकत्र येऊन लोकशाही
बळकट करायला हवी. संविधान जपायला हवं. महाविकास आघाडीने जनहिताच्या कामाचा अजेंडा जाहीर केला आहे. त्याची प्रभावी
अंमलबजावणी करू.’
याप्रसंगी कॉम्रेड दिलीप पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, शिवसेनेचे हर्षल सुर्वे, राष्ट्रवादीचे अनिल घाटगे,
समाजवादी पक्षाचे रविकुमार जाधव, लाल निशाण पक्षाचे प्रकाश जाधव यांची भाषणे झाली. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.
पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, शारंगधर देशमुख, प्रतिक्षा पाटील, कळंबा
गावच्या सरपंच सुमन गुरव, कॉम्रेड सतीश कांबळे, अर्बन बँकेचे संचालक संभाजी जगदाळे, धीरज पाटील, आपचे उत्तम पाटील, अमर
सरनाईक, बाळासाहेब कुलकर्णी, सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.

छत्रपतींचा अवमान कोल्हापूरकर सहन करणार नाहीत
शिवसेनेचे हर्षल सुर्वे म्हणाले, ‘महायुतीच्या उमेदवारांकडून शाहू छत्रपती यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. मात्र
कोल्हापूरची जनता शाहू छत्रपतींचा अवमान सहन करणार नाही. मंडलिकांनी जपून बोलावे, अन्यथा गाठ कोल्हापूरशी आहे. महायुतीचे
उमेदवार प्रचाराला आले की सिलिंडरची टाकी त्यांच्यासमोर ठेवा आणि दहा वर्षातील महागाईविषयी विचारणा करा.”