+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन
schedule30 Apr 24 person by visibility 80 categoryराजकीय

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटील गटाला धक्का.

      कोल्हापूर ता. २९: आमदार सतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून सतेज पाटील गटाला सोडचिट्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याची माहिती नेर्ली गावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश उर्फ अंकुश कृष्णात पुजारी यांनी दिली.


 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिणमध्ये सतेज पाटील यांचे नेर्ली येथील समर्थक लोकनियुक सरपंच प्रकाश उर्फ अंकुश पुजारी यांनी उमेदवार संजय मंडलिक व माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह महाडीक गटात जाहीर प्रवेश केला. कोल्हापूर लोकसभेच्या रणधुमाळीत सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का धक्का मानला जातो. 

   महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना समाजाच्या विविध घटकातून मोठा पाठींबा मिळत आहे . अनेकजण विकासाच्या बाजूने विचार करताना दिसत आहेत. विकसित भारतासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदी निवडण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात मताधिक्य मिळविण्यासाठी महायुतीने चंग बांधला आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून प्रचारफेरी काढली वळीवडे वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी हलसवडे येथे प्रचारफेरी करत संजय मंडलिक व माजी आमदार अमल महाडिक यांचे नेर्लीत आगमन झाले . त्यावेळी सरपंच पुजारी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

  यावेळी बोलताना लोकनियुक सरपंच म्हणाले," माजी आमदार अमल महाडिक यांच्या विचारांनी प्रभावित होवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. गावागावात खासदार मंडलिक यांनी केंद्र सरकार दिलेला निधी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रकार सतेज पाटील यांनी केला. हे आपल्याला पटलं नाही. "  

            संजय मंडलिक म्हणाले, " सतेज पाटील यांचा खरा चेहरा आता उघड होत असून लोक त्यांना सोडून चालले आहेत. गावामध्ये विकासगंगा आणण्यासाठी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर माजी आमदार अमल महाडिक यांनी मंडलिक यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन केले.

 यावेळी तानाजी पाटील, अनिल पंढरे, जितेंद्र संकपाळ,सदाशिव चौगुले, कृष्णात सुतार , भाऊसो पाटील ,मकरंद चौगुले, विक्रम पाटील, पोमान्ना पुजारी,विष्णू पुजारी,प्रकाश मगदूम, प्रदीप चौगुले, धनाजी नलवडे, अनिल मांडरेकर, योगेश मांडरेकर , अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.