+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना adjustडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल १०० टक्के* adjust*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या* *१९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड* adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव.
schedule30 Apr 24 person by visibility 74 category
राजेश क्षीरसागर यांचा इशारा

 संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जय भवानी चौक, कसबा बावडा येथे कोपरा सभा.

कोल्हापूर दि.२९ : "बावड्याचा विकास हेच शिवसेनेचे ध्येय आहे ; त्यामुळे विकास कामांच्या आडवे याल तर याद राखा. " असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिला.

महायुतीचे शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जय भवानी चौक, कसबा बावडा येथे कोपरा सभेत ते बोलत होते. 

क्षीरसागर म्हणाले," कसबा बावडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २०१९ ची निवडणूक वगळता सर्वच निवडणुकीत बावडावासियांनी शिवसेनेला साथ दिली आहे. हिंदुत्ववादी कसबा बावडा पुरोगामी करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस नेत्यांकडून होऊ लागला आहे. परंतु, कट्टर हिंदुत्वाची ज्योत कसबा बावडा वासीय सदैव तेवत ठेवतील. कसबा बावड्याच्या विकासाला शिवसेनेने नेहमी प्राधान्य दिले आहे. राजाराम बंधाऱ्याचा नवीन पुल आपल्या माध्यमातून मंजूर झाला. पण, त्याचे श्रेय घेता येत नाही म्हणून ते काम बंद पाडण्यासाठी काड्या लावण्याचे काम काहींनी केले. पण, आगामी काळात हा पूल पूर्णत्वास आणून अशा खुनशी राजकारणास चपराक देणार आहे. सगळं काम मीच केले असे म्हणवून घेण्याची सवय कॉंग्रेस नेत्याला लागली आहे. त्यांचा मीपणा इतका वाढला आहे कि , भर सभेत ते मतदारांना बघून घेण्याची भाषा करत आहेत. महायुती उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, ते आगामी ध्येयधोरणे सोडून व्यक्तिगत टीकेवर भर देवून मतदारांची दिशाभूल करत आहेत. कसबा बावड्याच्या विकासासाठी शिवसेनेने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पण, आमच्याकडून विकास कामे होतात म्हंटल्यावर त्यात आडकाठी घालण्याचे काम कॉंग्रेसच्या नेत्याकडून केले जाते.पुढील काळात कसबा बावड्याच्या विकास कामांच्या आडवे याल तर याद राखा, असा सज्जड इशारा देत ,कसबा बावड्याच्या सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक सुनील जाधव, प्रदीप उलपे, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख अमोल माने, किशोर घाटगे, शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर संघटक कृष्णा लोंढे, किसन खोत, पांडुरंग लोंढे, सचिन पोवार, रोहन उलपे, आदर्श जाधव, सचिन पाटील, राजू काझी, कपिल पोवार, सुरज सुतार , धवल मोहिते यांच्यासह भागातील नागरिक, महिला, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.