+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust गडहिंग्लज एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये* *फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी* adjustमहाराज जरा लक्ष ठेवा, नाहीतर वटमुखत्यार वाड्यावर नाव लावतील adjustचेतन’ यांचे व्हीजन घेऊनच कोल्हापूरचा विकास करणार ; शाहू छत्रपती adjustपोर्ले येथे सभेत सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन adjustगद्दार खासदाराला कायमचे घरी बसवा adjustसतेज पाटील यांच्या सुडाच्या राजकारणाला कंटाळून भाजपप्रवेश ; नेर्लीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पुजारी adjustआमच्या विरोधकांनी आता किमान अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी adjustविकासकामांच्या आडवे याल तर याद राखा ; कसबा बावड्याचा विकास हेच शिवसेनेचे ध्येय adjustमंडलिक यांनी 27 पैसे तरी कोणाला देऊन माहिती आहेत का?
schedule21 Apr 24 person by visibility 106 categoryराजकीय

देशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या.
आमदार प्रकाश आबिटकर.

सरवडे मतदारसंघात प्रचार दौरा..

सरवडे ता.२१: 
" देशाचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक पंतप्रधान मोदींच्या हाती सुरक्षित असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी
संजय मंडलिकांना साथ द्या." असे आवाहन राधानगरी- भुदरगड तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ राधानगरी- भुदरगड तालुक्याच्या सरवडे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.  

आमदार आबिटकर म्हणाले ," पंतप्रधान मोदींनी सामान्य माणसे डोळ्यासमोर ठेवून अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या.केंद्र व राज्य शासन यांच्या माध्यमातून पीएम किसान, आयुष्यमान भारत, जलजीवन,मोफत धान्य, कोविड काळात मोफत लसीकरण यासह अनेक योजना राबविल्या गेल्या. यासर्वांमुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर उंचावली आहे. पंतप्रधान मोदींनी अनेक कल्याणकारी योजना राबवून विकसित भारताचा संकल्प केला आहे.मोदींच्या या विकसित संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी आणि देशाची मान उंचावली.
तर जिल्ह्याच्या विकासात्मक कार्याला पाठबळ देत स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्याचा कायापालट केला . त्यांच्या विचारांचा आणि विकासाचा वारसा प्रा.संजय मंडलिक चालवित आहे. त्यांनी आपल्या खासदारकीच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे या विभागातील जनता भरघोस मताधिक्य देतील." असा विश्वास आ. आबिटकर यांनी व्यक्त केला. 
        संजय मंडलिक म्हणाले," राधानगरी भुदरगड तालुक्याच्या अतिदुर्गम भागात स्व.सदाशिवराव मंडलिक यांनी जनसामान्यांच्या जीवनात नंदनवन फुलविण्याचे काम केले. तर आपल्या खासदार पदाच्या माध्यमातून या भागात मोठा विकासनिधी देऊन या भागाचा कायापालट केला आहे. " 

यावेळी नंदकिशोर सुर्यवंशी, भाजपचे मानसिंग पाटील,अशोक फराकटे, के.के.राजिगरे,राजेश मोरे, किरण जठार, सिताराम खाडे, बाबुराव बसरवाडकर,विकास जाधव,शिवाजी चौगले,सुभाष चौगले, कुडंल पाटील,महेश पाटील, आसीन नवणे,शेखर पाटील, विजय महाडिक , डॉ. सुभाष जाधव,लहु जरग डी.एस.पाटील ,सुनिल चौगले, यांच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.