+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule28 Sep 22 person by visibility 149 categoryशैक्षणिकशैक्षणिक

-अभ्यासक्रमाचे 100 टक्के शुल्क माफ
-कुलपती डॉ संजय डी पाटील यांची घोषणा
-ओरिएटेशन प्रोग्राम व नव्या इमारतीचा शुभारंभ

तळसंदे :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे विविध अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या 17 विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतदेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशीप’ने सन्मानित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे 100 टक्के शुल्क माफ करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यापीठाच्या दुसऱ्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये अध्यक्षस्थानांवरून ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या शांताई हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष व कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डी. वय. पाटील अभिमत विद्यापीतठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डीन राकेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
 
 कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. 45 विद्यार्थ्यांसह या परिसरात पहिले कॉलेज सुरू केले आज या कॅम्पसमध्ये साडेपाच हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या विद्यापीठाच्या माध्यमातून सर्वोत्तम शिक्षण देऊ, याठिकाणी आपल्या पाल्याचे उत्तम करिअर घडेल याची खात्री बाळगा. येत्या काही वर्षात विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर पोहचावे यासाठी सर्व सहकारी कार्यरत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

    ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यापीठाच्या वाटचालीची माहिती दिली. सर्वोत्तम प्राध्यापक, सर्वोत्तम सुविधा या ठिकाणी दिल्या जात आहेत. अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात प्रवेश घ्यावा हे आमचे ध्येय असून त्या दृष्टीने आमचा प्रवास सुरू आहे. भविष्यात हे विद्यापीठ नामांकित शिक्षण केंद्र बनेल असा विश्वास डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केला

  कुलगुरू डॉ. के प्रथापन यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा व भविष्यातील योजनेचा आढावा मांडला. विद्यापीठात तीसहून अधिक पीएचडी प्राध्यापक आहेत. उद्योग पूरक अभ्यासक्रम, शिक्षक पालक बैठक, जागतिक पातळीवरील विविध संस्थाशी एम.ओ.यु. करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सकारात्मक विचार हाच यशाचा मार्ग- आम. सतेज पाटील

सकारात्मक विचार ठेऊन, योग्य ध्येय ठेऊन वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळते असे प्रतिपादन डी. वाय पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, कोण काय म्हणते यापेक्षा आपल्याला काय करायचे याचा ठाम निर्णय घेऊन विद्यार्थ्यांनी पाठपुरावा करावा. आपले आई- वडील व शिक्षक याना कधीही विसरू नका, त्यांची मान अभिमानाने उंचावेल असे काम करा. व्यसनामुळे 4 टक्के विद्यार्थी दरवर्षी शिक्षण अर्धवट सोडतात असे संशोधनात आढळले आहे. आपण उर्वरित 96 टक्के मध्येच राहू अशी शपथ विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. या विद्यापीठात अत्याधुनिक शिक्षण मिळेलच पण त्याहून महत्वाचे म्हणजे उत्तम चारित्र्य घडेल यासाठी विद्यार्थी व शिक्षक या दोहोनी प्रयत्न करावेत. हे विद्यापीठ काही वर्षांत पहिल्या 100 विद्यापीठात येईल व एनआरआय रँकिंगमध्येही मोठे स्थान मिळवले अशी खात्री आ. पाटील यांनी व्यक्त केली.

नोकरी देणारे विदयार्थी घडवणार-आ.ऋतुराज पाटील

पारंपरिक शिक्षणापेक्षा वेगळे काही तरी करण्यासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. 50 टक्के क्लासरूम शिक्षण, 30 टक्के प्रायोगिक तर 20 टक्के अनुभव शिक्षण अशी अभ्यासक्रम रचना केली आहे. आउट कमी बेस्ड शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. येथील विद्यार्थी नोकरी मागणार नव्हे तर नोकरी देणारा बनेल यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या विद्यार्थ्यांना ग्लोबल एक्सपोझर मिळवून देण्यासाठी तसेच संशोधनाला गती देण्यासाठी इस्राईल, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युके आदी देशातील ख्यातनाम विद्यापीठासोबत करार केले आहेत. शेतीतील नवे तंत्रज्ञान, संशोधन केव्हीकीच्या सहकार्याने शेतकऱ्यापर्यंत पोहचवू, जे सर्वोत्तम असेल ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्न करू अशी ग्वाही विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी दिली.

यावेळी संस्थेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, सीएफओ श्रीधर स्वामी, सीएचारओ श्रीलेखा साटम, केतन जावडेकर यांच्यासह ग्रुपच्या विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड अंजली पाटील, प्रा. सुनंदा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ जे ए खोत यांनी मानले.


सौ.शांतादेवी डी. पाटील मेरिट शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी

प्रत्येक अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेणाऱ्या १७ विद्यार्थ्याना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरिट शिष्यवृत्ती’ प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये अवंतिका उल्हास कदम (बीबीए), शिवानी सुधीर हुपरीकर (एमबीए), प्रणाली सर्जेराव वावरे (एमबीए-एबीएम), सरोश दाबीर पठाण (बी.टेक फूड टेक्नॉलॉजी), सचिन पतंग शिंदे (एम.टेक.फूड टेक्नॉलॉजी), शुभम चंद्रकांत इंगळे (एमएस्सी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी), रोहन संपत खोत (एमएस्सी अनलेटिकल केमिस्ट्री),ऋतुजा चंद्रकांत घोरपडे (एमएस्सी ऑर्गनिक केमिस्ट्री), सूरज सुखदेव माने (बी. टेक कॉम्प्युटर सायन्स), दिशा सचिन पाटील (बी. टेक कॉम्प्युट सायन्स एआय अँड एमएल), श्वेता धनाजी भोसले (बी. टेक. कॉम्प्युटर सायन्स -डेटा सायन्स), वरद सचिन बागल (एम. टेक कॉम्प्युटर सायन्स एआय अँड एमएल), सानिका रणजित पाटील (बीसीए), स्नेहा अरविंद जाधव (एमसीए), अथर्व अभय पाटील (बी.टेक अग्रीकल्चरल इंजिनिअरिंग), शोएब जहागीर पटेल (एम.टेक अग्रीकल्चरल इंजिनिअरिंग), वसिफा आगलावे (पी.एचडी.) यांचा समावेश आहे.