Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीरडॉ. कोडोलीकर यांना धम्मविचार साहित्य गौरव पुरस्कार जाहीरडी. वाय. पाटील विद्यापीठात* *सावित्रीबाई फुले यांना अभिवादन*सबका मंगल हो रूपाली पाटीलडी. वाय. पाटील मेडिकल संघाला विजेतेपदसतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तुफान तुडुंब गर्दी*

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटरच्या* *३०५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड*

schedule19 Aug 24 person by visibility 130 category


कोल्हापूर 
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स, डाटा सायन्स, आर्टीफिसियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आणि इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील तब्बल ३०५ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ८ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

   कॉम्पुटरशी संबंधित शाखानी आपली प्लेसमेंटची यशस्वी घोडदौड यंदाही कायम ठेवली आहे. विविध कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आले होते. यामध्ये टेक्नोगीज, डेसॉल्ट सिस्टीम, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, कंट्रोल एस, ईवाय जीडीएस, मास्टेक, पर्सिस्टंट, हेक्सवेअर, जारो एज्युकेशन, प्लॅनेट स्पार्क, कोर्स 5, फॉक्स सोल्युशन, क्वालिटी किओस्क, स्ट्रीबो, सायबर सक्सेस, एक्सेलर सोल्युशन, विप्रो पारी, न्यूट्रीनो टेक सिस्टीम, ऍमेझॉन इंडिया, टेक महिंद्रा, बीव्हीजी ग्रुप, चेक इंडिया, देवएंजल्स सॉफ्टवेअर, ई स्कॅन, ग्रायर ,हडल इंडिया, किरण अकॅडमी न्यूमेट्री टेक्नॉलॉजी, पेंटागॉन, क्यू स्पायडर, रेड जिराफ इकॉमर्स, टेक्नोलर्न, आर्जेलएनिग्मा टेक लॅब, इस्ट सन इलेक्ट्रॉनिक्स, एचडीएफसी इरगो, लंबडा रिसोर्सेस, टेक्नॉलाईट आदी कंपन्यांचा सहभाग होता.

यामध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या अलाय साहू याची पुणे येथील टेक्नोगीज कंपनीमध्ये टेक्नॉलॉजी कन्सल्टंट म्हणून निवड झाली असून त्याला वार्षिक 8 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. याच विभागाच्या मोहम्मदखालील मुजावर, ओम कोळी, सतेज काळेबेरे, सावनी लिंबेकर, श्रेया रेडेकर, शुभम पाटील, तुषार कांबळे, विकास पाटील, यश निकम आणि इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या नक्षत्रा देसाई, सन्मेश सावंत, विनायक हुपरे यांची डेसॉल्ट सिस्टीम या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर पदी निवड झाली असून या सर्वाना 7.8 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर झाले आहे. एआयएमएल विभागाच्या मानसी गावडे, ओम सावंत आणि कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या अनिकेत पारळे, मयूर गायकवाड, रूपम जाधव, ऋतुजा पाटील, शौकत मुल्ला, श्रेयस सावंत, श्रुती गुजर, स्नेहल चिकणे, तन्वी चव्हाण, यश नलावडे, डेटा सायन्स विभागाच्या साक्षी जारळी यांची कंट्रोल एस कंपनीमध्ये ६ लाख रुपयांच्या पॅकेजवर जॉब ऑफर मिळाली आहे. याशिवाय अन्य विद्यार्थ्यांना ३.५० लाख ते ४.६०लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.

  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याना व्यक्तिमत्व विकास व प्लेसमेंटच्या दृष्टीने सातत्याने प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केल्या जातात. टेक्निकल नॉलेज, संभाषण कौशल्य व नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. याचा फायदा विद्यार्थ्यांना उत्तम नोकरी मिळवण्यासाठी झाला. या निवडीसाठी अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, स्नेहल केरकर व सहकारी विभागप्रमुख प्रा. राधिका ढणाल, डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. टी. बी. मोहिते पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्रा. मनीषा भानुसे, प्र. आदिती साळुंखे, प्रा. पूजा पाटील, प्रा.संतोष कोरे, प्रा. धनश्री पाटील,प्रा नितीश शिंदे, प्रा.सूरज पाटील, प्रा. तेजश्री गुरव, प्रा. खोत यांनी विशेष परिश्रम घेतले.

    निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes