+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या adjustविकसित भारताच्या संकल्पासाठी गगनबावड्याची जनता मंडलिकांच्या पाठीशी
schedule26 Sep 20 person by visibility 889 categoryसंपादकीय
दबंग पोलीस उपनिरीक्षक बनला मजूरांच्या मुलांचा आवडता शिक्षक
आपले काम सोडून दुसऱ्या विभागाचे जादा व विनाशुल्क काम करायचा वेडेपणा करायला कोणी सांगितलाय?
उत्तराखंड मधील चंम्पावनच्या पोलीस ठाण्यातील खडूस पोलीस कॉन्टेबल कमला चौहान प्रेमळ टिचर बनून क्वारंटाईन केलेल्या कुटुंबातील एकोणवीस मुलांना अध्यापन करत होती
शांथप्पा जीदमनव्वर हे कर्नाटक राज्यातील बंगळूर मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या दबंगगिरी मुळे ते ओळखले जातात.कडक शिस्त, कायद्याचा धाक व जीवावर उदार होऊन काम करण्याची त्यांची जीवनशैली आहे
बंगळूर मधील अन्नपूर्णेश्वरी नगर परिसरात मजूरांची कुटुंबे राहतात. त्यामध्ये सुमारे पंधरा ते वीस मुले-मुली शालेय शिक्षण घेणारी आहेत. करोना महामारीमुळे शाळा कॉलेज बंद आहेत
कर्नाटक राज्यातील शाळा कॉलेज बंद असली तरी Online शिक्षण सुरू आहे.मजूरांची मुले असलेने मुलांकडे लॅपटाॅप व स्मार्टफोन मुलांच्या पालकांकडे व मुलांकडे नाही.ही मजूरांची सर्व मुले शिक्षणापासून वंचित आहेत. ही समस्या लक्षात घेऊन शांथप्पा यांनी आपली ड्युटी सांभाळून उर्वरित वेळात या मजूरांच्या मुलांना शिकविण्याचा निर्णय घेतला. परिसरातील मोकळ्या जागेचा वापर करून शिकवायला सुरवात केली.मजूरांच्या मुलांना खाकी वर्दीतील शिक्षकाची गोडी लागली
मजूरांची ही मुले शिक्षकाची आतुरतेने वाट पहातात. शांथप्पा यांनी मुलांना वह्या,पेन,पेन्सिली व पुस्तकेही आणली आहेत. शिक्षक मुलांना खाऊही आणतात.मास्क व सॅनिटायझर ही आणून दिला आहे. मजूरांच्या मुलांना हेच शिक्षक कायमचे असावेत असे वाटते.शिक्षकांनी दिलेला अभ्यास मुले मन लावून करतात
मजूरांची सर्व मुले - मुली शिकताना मास्क वापरतात.सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाते.शिक्षकही मास्क वापरतात. सॅनिटायझरचा वापर केला जातो
खाकी वर्दीतील माणूस म्हणजे त्याला काळीज नसते, अंत:करण नसते तो केवळ शिस्त व कायदाच पाळतो असा समज खोटा ठरवून शांथप्पा यांनी चाकोरीबाहेर जाऊन जादा काम सुरू केले आहे. शांथप्पा यांना याबाबत विचारता ते म्हणतात," दिवसरात्र बंदोबस्त, कायम शिस्त लावणे , लोकांना कायद्याचा धाक दाखवून नियम पाळायला लावणे हे केल्यामुळे मनावर प्रचंड ताण येतो.मुलांना शिकविताना सर्व दिवसभराचा ताण जाऊन मी फ्रेश होतो.घरच्यांनाही चेहऱ्यावरील हा ताजेपणा दिसून येत आहे,त्यामुळे घरचेही आनंदी आहेत."
पोलीस उपनिरीक्षक म्हणून करोना काळात ड्युटी करणं म्हणजे जीव धोक्यात घालून काम करणे असते. आपली ड्युटी केंव्हा संपते व आपण केंव्हा घर गाठतो असे होत असताना शांथप्पा मात्र मजूरांच्या मुलांच्यात रमत आहेत. आपली नसणारी जबाबदारी पार पाडत आहेत .पदरचे खाऊन हल्ली कोणी लष्कराच्या भाकरी भाजणारे सापडत नाहीत.मात्र पदरमोड करून, समयदान करून मुलांना शिकविणाऱ्या शांथप्पा जीदमनव्वार आपणास सस्नेह वंदन. आपणास आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे . आपणाकडून यापुढेही विविध जमाजभान जपणारी कार्ये घडत राहोत
संपत गायकवाड( माजी सहाय्यक शिक्षण संचालक)