+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या adjustविकसित भारताच्या संकल्पासाठी गगनबावड्याची जनता मंडलिकांच्या पाठीशी
schedule01 Jan 21 person by visibility 679 categoryसंपादकीय

 अपेक्षा 2021: 

सर्वप्रथम नवीन वर्षाच्या निमित्ताने आवाज इंडिया लाईव्हला व आवाज इंडिया लाईव्ह च्या सर्व वाचकांना मनापासून शुभेच्छा. 2020 हे वर्ष सगळ्यांना कायमचे स्मरणात राहणारे व एक नवीन शिकवण देणारे वर्ष ठरले. हे आपण सर्वजण विसरु शकणार नाही.अर्थातच जागतिक कोरोना आरोग्य अणिबाणी असं त्याला म्हणू शकतो. 2020 मध्ये जगभरात कोरोनामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली. सध्या आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे, लवकरच कोरोनाची लस निर्माण होईल अशी ही आशा व अपेक्षा 2021 मध्ये आहे. त्यामुळे जगभरातील मानवी आरोग्याचा प्रश्न मिटेल. 2021 ला सामोरे जाताना खूप काही आठवणी बरोबर असतील व अपेक्षांचे ओझे ही प्रत्येकाच्या मनात असेल. किमान 2021 मध्ये कोरोनाचे संकट दूर व्हावे ही अपेक्षा पृथ्वीवरील सबंध मानवी समूहाची आहे. 2021 मध्ये भारताला ही विविध आव्हाणे असतील. शेती, रोजगार, उद्योग व व्यापार, ग्रामीण -नागरी विकास, विज्ञान व तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आदी घटकांकडून विकासाच्या अपेक्षा आहेत. 2020 मध्ये आपला देश महासत्ता बनेल हे स्वप्न आपण उराशी बाळगले होते. त्यादृष्टीने देशाची प्रगती ही केली होती. जगात सामर्थ्यशाली देश म्हणून आपल्या देशाचे नाव पुढे येत होते पण 2020 मध्ये जागतिक पातळीवर कोरोना संकट निर्माण झाले व त्याचा परिणाम विविध क्षेत्रावर झाला. भारतीय भूमीने अनेक आव्हाने स्विकारली आहेत व त्यातून मार्ग काढून देशाने प्रगती साधली आहे. असे असले तरी सध्या देशात गरिबी, कुपोषण, बेकारी, पर्यावरणाचे भयाणक प्रश्न प्रखरतेने जाणवतात. या समस्याचे आव्हाण देशासमोर मोठे आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आज काळजी गरज बनली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडलेला आहे. देशात कृषी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात उद्योगधंद्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार संशोधन करणे गरजेचे बनले आहे. विदेशी धोरण व गुंतवणूक आदी क्षेत्रात प्रगतीची अपेक्षा आहे. अवकाश व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये ही प्रगती करणे गरजेचे बनले आहे. नवीन विषयावर संशोधन होणे महत्वाचे आहे. 2021 ची पहाट उगवेल त्यावेळी भविष्याचा वेध घेताना वरील बाबींचा विचार होणे अपेक्षित आहे. विकासाच्या दृष्टीने नवे दमदार व सकारात्मक पाऊल टाकणे गरजेचे आहे. भूतकाळातील अनुभवावरुन मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. शेतीबरोबरच ग्रामीण विकास व रोजगार निर्मितीवर लक्ष द्यावे लागेल. विकास पासून वंचित असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नैसर्गिक पर्यावरणाची हानी न करता प्रदुषण विरहीत शाश्वत विकास साधला गेला पाहिजे. 2021 मध्ये शाश्वत विकासाच्या दृष्टीने झेप घ्यायचे असेल तर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांनी गांभिर्यपुरवक घेणे अपेक्षित आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये पर्यावरण चळवळ रुजवणे गरजेचे बनले आहे व हेच अपेक्षित आहे. सगळ्यांना पुन्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा

डाॅ युवराज शंकर मोटे

भूगोल व पर्यावरण अभ्यासक, कोल्हापूर

आवाज इंडिया लाईव्ह टिम कोल्हापूर

मो.9923497593

ईमेल:ysmote@gmail.com