+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule20 Sep 22 person by visibility 156 categoryशैक्षणिकशैक्षणिक
-डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे प्रतिपादन 
-अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन 

कोल्हापूर :

अभियंता हा इतरांपेक्षा वेगळा विचार करतो व त्यातूनच नव्या सुविधा तंत्रज्ञान निर्माण होते. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे 'प्रॉब्लेम सॉल्व्हर्स' असून, अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी केले. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (स्वायत्त संस्था) आयोजित 'अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३' या विषयावरील मार्गदर्शनपर सेमिनारमध्ये ते बोलत होते.

 हॉटेल सयाजी येथे झालेल्या या सेमिनारचे डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिय तज्ञ डॉ. कुणाल पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, प्रा रवींद्र बेन्नी, डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती दीपप्रज्वलनाने शुभारंभ झाला. या सेमिनारला 1200 हुन अधिक विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.

 अभियंत्यांची संख्या वाढल्याने त्यांना पुरेशा नोकऱ्या नसल्याची चर्चा होताहे. मात्र वस्तुस्थित तशी नाही. साध्य सर्वधिक करिअरची संधी अभियांत्रीकिंध्येच आहे. बहुतांश मुलांना कॉम्प्युटर सायन्समध्येच शिक्षण घ्यायचे आहे. कॉम्प्युटर म्हणजे हमखास नोकरी असा समज निर्माण झाला आहे. मात्र अभियांत्रिकीच्या अन्य शाखाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सरकारी नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. मकेनिकलचे महत्व कधीच कमी होणार नाही, वाहन उद्योगात या अभियंत्यांची मागणी सतत राहील. रसायन उद्योगासह अन्यत्र केमिकल इंजिनिअरला मोठ्या संधी आहेत. मोबाईल व अन्य गॅझेटचे मार्केट वेगाने वाढत असून इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशमध्ये अभियंत्यांना मोठी संधी आहे. कॉम्प्युटरच्या विविध शाखांमध्येही अगणित संधी आहेत. त्यामुळे आपली आवड, बाजाराची गरज व संधी ओळखून शाखा निवडावी, असे आवाहन डॉ गुप्ता यांनी केले.

अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी 4 हजार कोटींहुन अधिक रकमेची शिष्यवृत्ती देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. परिणामी या अभ्यासक्रमाचे शिक्षण महागडे नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. 
 मेटाव्हर्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या शाखा नोकरीचे दरवाजे ठोठावत आहेत."

सीईटीचा निकाल लागला असून 4 दिवसात प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. यामध्ये कोणती शाखा निवडावी, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्रे लागतील, सीट अलोटमेंट, याबाबतही डॉ. गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न व शंकांचे सविस्तर निरसन डॉ.गुप्ता, डॉ. पाटील यांनी केले. 

 यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्राचार्य डॉ संतोष चेडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. सुनंदा शिंदे यांनी केले.तर आभार प्रा. रवींद्र बेन्नी यांनी मानले.

रोजगारामध्ये अभियांत्रिकीच नं. 1 -

नोकरीची संधी असलेल्या शाखांचा विचार केल्यास पहिल्या स्थानावर बी. ई. बी. टेक, तर दुसऱ्या एमबीए आहे. अन्य कोणत्याही अभ्यासक्रमापेक्षा अभियांत्रिकीमध्ये नोकरीच्या सर्वधिक संधी आहेत. 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या 9, 41, 391अभियंत्यापैकी 89 टक्के विद्यार्थ्यांन नोकरी अथवा व्यवसायाची संधी मिळाली असल्याचे डॉ. गुप्ता यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.

व्हेरिफिकेशन फिजिकली, कॅपच्या तीन फेऱ्या- डॉ. कुणाल पाटील

राज्य सीईटी सेलचे प्रवेश प्रक्रिया तज्ज्ञ कुणाल वाय. पाटील यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. माहिती पुस्तिका सविस्तर वाचावी व त्यानंतरच अर्ज भरावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केवळ फिजिकल मोडनेच होणार आहे, त्यामुळे अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व कागदपत्र झेरॉक्स नजीकच्या सुविधा केंद्रात तपासून घ्या, असे आवाहन केले. त्याचबरोबर यावर्षी 'कॅप'च्या तीन फेऱ्या होणार असल्याचे डॉ. कुणाल पाटील यांनी सांगितले.