Awaj India
Register

जाहिरात

 

आदर्श सेवाभावाची अंगणवाडी सेविका लता यादव

schedule27 Nov 25 person by visibility 12 categoryशैक्षणिक

भाटणवाडी (ता. करवीर)   अंगणवाडी क्रमांक १३९ मधील सेवाभावी, कार्यतत्पर आणि गावातील सर्वांची लाडकी अंगणवाडी सेविका म्हणून सौ. लता सखाराम यादव यांचा आदर्श कार्याचा लौकिक वाढत आहे. तब्बल ३८ वर्षांच्या अखंड सेवाकाळात त्यांनी बालविकास, पोषण, साक्षरता आणि सामाजिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरीसह सर्वांचा विश्वास जिंकला आहे.
 
शैक्षणिक पात्रता: B.A., Marathi
अंगणवाडी: भाटणवाडी, ता. करवीर
पर्यवेक्षिका: सौ. कांबळे (M.A.)
छंद: गरजूंना मदत करणे
 
कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी
 
सौ. यादव यांनी नेहमीच शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देत मुलांच्या मूलभूत शिक्षणात मोठी वाढ केली.
 
पालक संपर्क, गृहभेटी, ऑनलाईन उपक्रम, साक्षरता अभियानांतर्गत केलेले काम विशेष प्रशंसनीय.
 
शासकीय योजनांची माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवून गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला.
 
उपक्रमांमध्ये मोबाईलचा योग्य वापर करून मुलांमध्ये शिकण्याची आवड निर्माण केली.
 
 
गौरवपूर्ण पुरस्कार
 
2022-23 : “राष्ट्रीय पोषण अभियान”अंतर्गत प्रथम क्रमांक पुरस्कार
 
2023-24 : “महिला व बालविकास विभागाचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार”
 
2023-24 : विविध उपक्रमातील प्रभावी कामगिरीबद्दल प्रथम क्रमांक सन्मानपत्र
 
 
बालविकासासाठी उपक्रम
 
रोज वेळापत्रकानुसार अभ्यास, खेळ, व्यायामाचे नियोजन
 
बाजारपेठ, रस्ता, वाहतूक, यात्रा यांची माहिती देऊन बाह्यजगाचा अनुभव
 
"टाकाऊपासून टिकाऊ" उपक्रमाद्वारे सर्जनशीलता
 
मुलांचे वाढदिवस अंगणवाडीत साजरे करून पालकांचा सहभाग वाढवणे
 
माता-बाल पोषण बैठका, पालक सभा, विद्यार्थ्यांची प्रगती नोंद
 
कोरोना, कुष्ठरोग, स्वच्छता सर्व्हे—शासकीय कामात विनामूल्य सहभाग
 
बचतगट उपक्रम, सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रांगोळी स्पर्धा
 
दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक मदत
 
गावातील कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग
 
 
गावासाठी विश्वासू सेविका
 
नेहमी हसतमुख, तत्पर, सेवाभावी स्वभावामुळे लता यादव या भाटणवाडीच्या आदर्श अंगणवाडी सेविका ठरल्या असून त्यांचा गावातील स्त्री-बालविकास क्षेत्रातील योगदानाला सर्वत्र दाद मिळत आहे.
 
 
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes