Awaj India
Register

जाहिरात

 

कोल्हापुरातील सौ. सविता पाटील ‘आदर्श शिक्षिका’; शिक्षण–समाजकार्याचा अनोखा संगम

schedule27 Nov 25 person by visibility 14 categoryशैक्षणिक

कोल्हापुरातील सौ. सविता पाटील ‘आदर्श शिक्षिका’; शिक्षण–समाजकार्याचा अनोखा संगम
 
कोल्हापूर : इंग्रजी विषयातील प्रगल्भता, महिलांसाठी उपक्रमांची मालिका आणि सामाजिक बांधिलकीची जाण या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या सौ. सविता राजेंद्र पाटील यांचा ‘आदर्श शिक्षिका’ म्हणून सर्वत्र गौरव होत आहे. २७ वर्षांच्या समृद्ध सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकत शिक्षणक्षेत्रात आपली खास छाप उमटवली आहे.
 
इंग्रजीचा निकाल शंभर टक्के ठेवत त्यांनी शाळेचा विश्वास जपला. E-KELTA इंग्रजी शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी पाच वर्षे काम करत राज्यभरातील शिक्षकांना दिशा दिली. “व्यक्तिमत्व विकासाची सूत्रे” हे पुस्तक, तर १५ वर्षांची Master Trainer म्हणूनची कारकीर्द विद्यार्थ्यांना भक्कम आधार देणारी ठरली.
 
याशिवाय महिलांसाठी पाककला स्पर्धा, हक्क विषयक व्याख्याने, आरोग्य शिबिरे, बचत गट, उद्योजक मार्गदर्शन, महिला ग्रंथालय असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. सामाजिक क्षेत्रात रक्तदान–आरोग्य शिबिरे, होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, ‘कमवा व शिका’ मार्गदर्शन, FFF द्वारे पर्यावरण संवर्धन यांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
 
राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवाच्या संस्थापक सदस्य म्हणून त्यांची भूमिका लक्षणीय राहिली. अनेक संस्थांच्या संचालिका व अध्यक्षा म्हणूनही त्यांनी नेतृत्व सिद्ध केले.
 
त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन त्यांना स्टार अकॅडमीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लबचा नेशन बिल्डर पुरस्कार, तसेच शिक्षणमंत्र्यांकडून उत्कृष्ट तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून सन्मान मिळाला आहे.
 
 
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes