
अन्यायी ब्रिटिश राजवटी पासून भारताची मुक्तता करण्यासाठी भारतीयांचा असंतोष ब्रिटिशांच्या पर्यंत झाल मतवादी विचारसरणीने पोहोचवून स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी फुंकले असे मत प्राचार्य बी एस पाटील यांनी व्यक्त केले इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक स्मृतिदिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा शांताराम कांबळे होते.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य बी एस पाटील म्हणाले की, ब्रिटिशांची राजवट ही अन्याय राजवट म्हणून जगद्विख्यात असताना सुद्धा भारतातील लोकांचे संघटन उभारून त्यांच्यामध्ये स्वत्वाची जाणीव निर्माण करून ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांचे संघटन टिळकांनी उभे केले.
यावेळी अध्यक्षस्थानी बोलताना प्रा शांताराम कांबळे म्हणाले की, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना ओळखले जाते ती त्यांनी लिहिलेल्या वर्तमानपत्रातील अग्रलेखांमुळे. त्यांचे अग्रलेख हा स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय म्हणून विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे पाहिले पाहिजे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते