+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule15 Jul 22 person by visibility 153 categoryराजकीयक्रीडा
*टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधवच्या पाठीवर*
*आमदार ऋतुराज पाटील यांची कौतुकाची थाप*
कोल्हापूर-
जागतिक टेनिस क्रमवारीमध्ये 14 वर्षाखालील गटात अग्रस्थानी असणारी आणि त्याच गटातून विम्बल्डनमध्ये चमकलेली कोल्हापूरची टेनिस क्वीन ऐश्वर्या जाधव लंडनहून कोल्हापूरमध्ये दाखल झाली. ऐश्वर्या कोल्हापूरमध्ये दाखल होताच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी तिच्या निवासस्थानी जावून भेट घेत तिच्या कामगिरीचे कौतुक केले. पहिल्या प्रयत्नात यशाने हुलकावणी दिली असली, तरी तिने दाखवलेली जिद्द ही अभिमानास्पद व कौतुकास्पद असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी ऐश्वर्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
   विम्बल्डन सारख्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एवढ्या लहान वयात भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऐश्वर्या एकमेव खेळाडू ठरली आहे. तिच्या या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. येणाऱ्या काळामध्ये ऐश्वर्या टेनिस विश्वात कोल्हापूरचे आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी उंचावेल, असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
   यावेळी पाटील यांनी स्पर्धेबद्दल अनुभव जाणून घेतले. ऐश्वर्या आणि तिच्या पालकांचे अभिनंदन करता आमदार पाटील यांनी भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी ऐश्वर्याचे प्रशिक्षक हर्षद देसाई, मानल देसाई, ऐश्वर्याची आई अंजली, वडील दयानंद जाधव उपस्थित होते. 
   आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लंड येथे झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत आशियाई संघाकडून 14 वर्षांखालील वयोगटात भारताचे प्रतिनिधित्व करणारी ऐश्वर्या जाधव ही एकमेव कोल्हापूरची होती. दरम्यान, ऐश्वर्या फ्रान्समध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी गुरुवारी रवाना होणार आहे.