वृक्षप्रेमी संस्थेतर्फे टेंबलाई उद्यानात 51 देशी झाडांचे वृक्षारोपण .....
schedule28 Sep 21 person by visibility 480 categoryसंपादकीय
दिनेश चोरगे ( कोल्हापूर) : वृक्षप्रेमी संस्था आणि कोल्हापूर महानगरपालिका गार्डन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने टेंबलाई उद्यान सुशोभित करून 51 देशी झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.
या 51 देशी झाडांमध्ये ताम्हण, पांढरी सावर, सीता अशोक, नाग केशर, बेहडा, पाडळ, बीटी, पुडिका चाफा, हिरवा चाफा, काटेसावर, सीता रंजन ,टीकोमा, नीर फणस, सीताफळ, आवळा, अर्जुन, नीलमोहर, द्वार्फ मुसांडा, फोइ तिडा अशा अनेक औषधी झाडे तर शोभेच्या फुलझाडाचा समावेश करण्यात आला होता.
कोल्हापूर शहराची फुफ्फुसे असलेल्या उद्यानात नागरिकांना सहजरित्या मुक्त श्वास, ऑक्सिजन मिळावा
,लहान मुलांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी स्वच्छ अधिवास निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम राबविण्यात आली होती.
या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुद्दे, सतीश कोरडे ,परितोष उरकुडे ,नेत्रपाल जाधव, अक्षय कांबळे, डॉ.अमृता कोठावळे, विकास कोंडेकर, सचिन पोवार, उदयसिंह जाधव, भालचंद्र गोखले, अनुज वागरे ,साजिद शेख, विशाल पाटील, शैलेश टिकार, महेश व्यापारी, रोहन बेविन कट्टी ,अमर कोठावळे, निखिल शेटे, अभिजित गडकरी आदी सदस्यांनी सहभाग घेतला.