तळसंदे/वार्ताहर
कृषी व कृषीसंलग्न पदवी अभ्यासक्रमासाठी सुरु असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीमध्ये एमएच-सीईटी परीक्षेमध्ये तब्बल ९९.५५% गुण मिळवून डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या कु. प्रज्ञा मानसिंग भोसले हिचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद, पुणे यांच्याकडून प्रथम वर्ष कृषी व कृषी संलग्न पदवीच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीची यादी नुकतीच जाहीर झाली. त्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद आहे.
या स्वागत समारंभावेळी महाविद्यालयाचे अकॅडमीक इन्चार्ज प्रा. आर. आर. पाटील, डॉ. व्ही. आर. पाटील आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील व कार्यकारी संचालक, डॉ. ए. के. गुप्ता यांनी प्रज्ञाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.