
आनूर :(आवाज इंडिया प्रतिनिधी नामदेव गुरव)
: कागल तालुक्यातील आनूर येथे 9 फेब्रुवारी 2023 रोजी लोकनियुक्त सरपंच काकासाहेब सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत एकमताने गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पुंडलिकराव दत्तात्रय सावडकर यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या "अध्यक्ष पदी" निवड करण्यात आली. गावातील गट-तट, पक्ष बाजूला ठेऊन सर्वानुमते तंटामुक्त अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी समितीचे माजी अध्यक्ष अण्णासो इंदलकर यांनी नवीन अध्यक्षांचे नाव सुचवले व बाळगोंड पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
नवनिर्वाचित तंटामुक्त अध्यक्ष पुंडलिक सावडकर यांनी कोणावरही अन्याय न होता गावातील सर्वांना विश्वासात घेऊन न्यायदानाचे काम केले जाईल असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच रविकिरण सावडकर, अण्णासो इंदलकर, सागर कोळी, आनंदा लोहार,दादासो चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
ग्रामसभेस ग्रामविकास अधिकारी गुळवे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य विजय खोत,विजय पाटील, मीनाक्षी लोहार, ज्ञानेश्वरी कोळी, विनायक खोत,नामदेव गुरव, सुवेश चौगुले, प्रकाश माने,अप्पासो भांदीगरे, दत्तात्रय आरडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच ऋषिकेश देवडकर यांनी आभार मानले.