चंदगड (आवाज इंडिया)
ध्येय निश्चित करुन,प्रचंड जिद्द बाळगून सातत्याने अभ्यास केल्यास निश्चित यश मिळते.यासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंदगड येथील र.भा.माडखोलकर महाविद्यालयातील मराठीचे प्रा.डाॕ.गुंडूराव कांबळे यांनी केले .
ते शिवणगे येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते .अध्यक्षस्थानी वस्तीगृहाचे अधीक्षक नवनीत पाटील होते .
प्रा.डाॕ.कांबळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की,माजी आमदार कै.नरसिंगराव भुजंगराव पाटील यांच्या सत्यशोधकीय व पुरोगामी विचारांचा आदर्श वैचारिक वारसा या शिवणगे गावाला आहे .या.वस्तीगृहात राहून अनेक विद्यार्थ्यांनी देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपर्यात आपल्या कामाचा यशस्वी ठसा नोंदवला आहे . वेळ अजिबात वाया न घालवता विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचण्यासाठी धडपडले पाहिजे .वैविध्यपूर्ण वाचणावर व आपल्या अभ्यासावरच आपले लक्ष केंद्रीत करायला हवे.सातत्याने चौफेर वाचनानेच आपले व्यक्तीमत्व प्रगल्भ बनते.चंदगड तालुका ही गुणवंताची खाण असून तालुक्यातीला अनेकांनी विविध क्षेत्रात उतुंग यश मिळवून, नावलौकिक मिळवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे .तोच आदर्श कायम ठेवून आपल्या परिस्थितीला दोष न देता प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास हमखास यश मिळते असेही त्यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिले .
अध्यक्षीय भाषणात नवनीत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करुन यशाची गरुडझेप घ्यावी असे आवाहन केले .
प्रास्तविक रमेश कांबळे यांनी केले .सूत्रसंचालन विवेक लहू गावडे यांनी केले .तर आभार विठ्ठल जाणकर यांनी मानले.यावेळी वस्तीगृहातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते .