+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule08 Jul 24 person by visibility 151 category
कोल्हापूर ;

मराठी चित्रपटसृष्टीत नवीन आयाम घेऊन येणारा 'विषय हार्ड 'हा चित्रपट ५ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून कोल्हापूरातील पीव्हीआर सिनेप्लेक्स येथे सुमित,पर्ण पेठे यांच्यासह सर्व कलाकारांच्या उपस्थितीत प्रिमियर शो उत्साहात व दणक्यात संपन्न झाला.यावेळी कोल्हापूरात प्रथमच कलाकारांचे मोठे कट आऊट लावून आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. 
या चित्रपटाचा टीझर आणि गाणी यापूर्वीच प्रदर्शित झालेली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तसा आज चित्रपटही प्रेक्षकांना प्रचंड आवडला. 
मूळात इंजिनियर असणाऱ्या सुमितने चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर लघुचित्रपट, टीव्ही एपिसोड्स, रिॲलिटी शोज, जाहिराती अशा माध्यमातून दहा वर्षे काम केले आणि आपल्या अनुभवाच्या पायावर 'विषय हार्ड 'ची निर्मिती केली. 'विषय हार्ड' ही गोष्ट शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील लोकांना आपल्याच भागात घडणारी गोष्ट वाटत आहे.
अनोख्या प्रेम कथेला फुलवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना एका बाजूला खळखळून हसवणारा आणि दुसऱ्या बाजूला विचार करायला लावणाराही आहे. यांनी चित्रपटाची  दृश्ये आणि संवाद चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत.
ही नेहमीची प्रेमकथा नाही कारण त्यातील नायक- नायिकेसमोर एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. त्यांचं १२ वर्षांचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त ५ तास आहेत आणि परिस्थितीमधील विचित्र संकटांना तोंड देताना जो गोंधळ उडतो, त्यातून हास्यकल्लोळ निर्माण होतो, त्याचबरोबर काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. हे सर्व प्रसंग अतिशय कलात्मक पद्धतीने एकमेकांत गुंफण्यात आले आहेत. या चित्रपटामधून प्रेक्षकांना मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या रंगांची सफर घडणार आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील परिस्थितीचे चित्रण त्यामध्ये आहे, त्याशिवाय कुटुंब, समाज, राजकारण अशा सर्वच बाजूंना स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. केवळ तरुणाईच नव्हे तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट आकर्षित करणारा आहे. 
पर्ण पेठे या कसलेल्या अभिनेत्रीने आपली नायिकेची भूमिका अतिशय दमदारपणे वठवली आहे. या चित्रपटाद्वारे सुमित हा नवोदित कलाकार लेखक, दिग्दर्शक, नायक आणि निर्माता म्हणून सिनेसृष्टीत दमदार पदार्पण करत आहे. नवोदित असूनही  आपली छाप पाडण्यामध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. या दोघांसोबत हसन शेख, नितीन कुलकर्णी, विपीन बोराटे, प्रताप सोनाळे, भूमी पाटील, चैत्राली इनामदार, आनंद बल्लाळ आदी कलाकारांच्या भूमिकाही उत्कृष्ट झाल्या आहेत. 
या चित्रपटातील गीतांचे लेखन नंदकुमार गोरुले, सुदर्शन खोत, साहिल कुलकर्णी, सुमित, रिषभ पाटील, विशाल सदाफुले यांनी केले आहे. साहिल कुलकर्णी यांनी या गीतांना संगीत दिलं आहे. अभिषेक शेटे आणि जय पारीख यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, स्वप्नील बांदेकर आणि विनायक सुतार यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी ओंकार शेटे यांनी सांभाळली असून, सायली घोरपडे यांनी वेशभूषा केली आहे. सौरभ प्रभुदेसाई यांनी संकलन केलं असून, संदीप गावडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. 
गीत, संगीत, सिनेमॅटोग्राफी, कला, नृत्य, दिग्दर्शन, वेशभूषा, संकलन आदी सर्व पातळ्यांवर चित्रपट दर्जेदार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.