Awaj India
Register
Breaking : bolt
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बदली व पुनर्नियुक्तीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गर्जना संघटनेची मागणीभाजपचे मनसुबे हाणून पाडणार; 'डीपीआय' उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणारइंजिनिअरिंग १३ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी:उच्च न्यायालयाचा दिलासा कोल्हापूर खंडपीठाचा अंतरिम आदेशकोल्हापुरात विंचारेमाळ येथे जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्तवकिलाला मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करा; ॲड. तौसिफ शेख यांची मागणीयुनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून* *डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट*हुपरीत ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन; रक्तासाठीची नागरिकांची धावपळ थांबणारNEET परीक्षेतील घोटाळ्याचा निषेध; कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देणारग्रामीण विकासासाठी अध्यक्षा शिल्पा खोत यांचा धडाकेबाज तालुका दौरा; गडहिंग्लजमध्ये नागरिकांच्या समस्यांवर प्रशासन तत्परकोल्हापूरच्या पाच तालुक्यांत आता फुलणार ‘पांढरे सोने’; ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेसाठी १० मे पासून अर्ज प्रक्रिया सुरू

जाहिरात

 

कोल्हापुरात विंचारेमाळ येथे जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

schedule16 May 26 person by visibility 17 categoryगुन्हे

​कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी): शहरातील विंचारेमाळ येथील शिख गल्लीत सुरू असलेल्या बेकायदेशीर 'तीन पानी' जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी (१६ मे) मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. एका भाड्याच्या घरात बेकायदेशीरपणे पैशांची पैज लावून जुगार खेळणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत ६१,२०० रुपयांची रोख रक्कम आणि ८४,००० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, असा एकूण १,४५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश सदानंद पाटील (ब.नं. १२४२, रा. नेमणूक- शाहूपुरी पोलीस ठाणे, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​आरोपींची नावे व संपूर्ण पत्ते:
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आणि त्यांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत:
​१) नियाज दावन इनामदार (वय ३६ वर्षे, धंदा- सेंट्रींग काम, रा. साळुंखेनगर, वाल्मीकी आंबेडकर आवास योजना, कोल्हापूर)
२) सागर मारुती कागले (वय २९ वर्षे, धंदा- चप्पल दुकान कामगार, रा. वृक्षाली हॉटेल पाठीमागे, सदर बाजार, कोल्हापूर)
३) पोपट वसंत हेगडे (वय ४२ वर्षे, धंदा- गवंडी काम, रा. भगतसिंग वसाहत, कसबा बावडा, कोल्हापूर)
४) उमर उर्फ बंडा अय्याज फकीर (वय ३२ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. शिख गल्ली, विंचारेमाळ, कोल्हापूर)
५) अमित दिलीप वडणकर (वय ४५ वर्षे, धंदा- ड्रायव्हर, रा. लोणार वसाहत, शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर)
६) महेश रामचंद्र लोखंडे (वय ४५ वर्षे, धंदा- आचारी, रा. महालक्ष्मी नगर, गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
७) मुनाफ अयुब बागवान (वय २७ वर्षे, धंदा- व्यापारी, रा. डोर गल्ली, बिंदु चौक, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
८) मंगेळ चंद्रकांत पाटील (वय ३८ वर्षे, धंदा- पेंटर, रा. राजारामपुरी २ री गल्ली, मांगवाडा, कोल्हापूर)
९) संदीप मारुती वायदंडे (वय ३९ वर्षे, धंदा- पेंटिंग, रा. ए.पी. स्कुल कंपाऊंड, कनाननगर, कोल्हापूर)
१०) राजेन्द्र सदाशिव निकम (वय ६४ वर्षे, रा. उभा मारुती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर)
११) सोहेल अस्लम शेख (वय २३ वर्षे, धंदा- फळाची गाडी, रा. भारतनगर, मनोरा हॉटेलची मागील बाजू, राजारामपुरी, कोल्हापूर)
​भाड्याच्या खोलीत भरवला जुगार; अशी झाली कारवाई:
​पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विंचारेमाळ, शिख गल्ली येथील आरोपी उमर उर्फ बंडा अय्याज फकीर याने त्याचे भाड्याचे घर जुगार खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. या ठिकाणी अनेक लोक एकत्र येऊन विनापरवाना बेकायदेशीरपणे पैशांवर 'तीन पानी' नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
​या माहितीच्या आधारे १६ मे २०२६ रोजी मध्यरात्री ००.०५ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने सदर घराची वेढाबंदी करून छापा टाकला. यावेळी वरील सर्व ११ आरोपी ग्रुप करून एकत्र बसून जुगार खेळताना रंगेहात आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केले.
​सदर कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोसई सागर गुनवरे यांनी दाखल केली असून, या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोसई आकाश जाधव करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes