वकिलाला मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करा; ॲड. तौसिफ शेख यांची मागणी
schedule16 May 26 person by visibility 32 categoryगुन्हे
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वकिलाला मारहाण झाल्याच्या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी ॲड. तौसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत केल.
शेख यांनी सांगितले की, १४ एप्रिल २०२६ रोजी वाहन चलनासंदर्भात माहिती विचारण्यासाठी गेले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी सुरेश पाटील आणि रुपेश माने यांनी त्यांच्यासह त्यांच्या मित्रांना मारहाण केली. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या घटनेमुळे कोल्हापूर बार असोसिएशनसह राज्यभरातील वकिलांनी निषेध व्यक्त केला असून, संबंधित पोलिसांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्याऐवजी वकिलांवर दबाव टाकणे, मारहाण करणे आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
दरम्यान, कोल्हापूर पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे शेख यांनी म्हटले. कायद्याचे रक्षण करणारेच जर दहशतीचे वातावरण निर्माण करत असतील, तर सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.