विद्यार्थ्यांच्यामधील कौशल्य ओळखून करिअर निवडा: रवींद्र खैरे
schedule12 Feb 25 person by visibility 113 categoryसामाजिक

कोल्हापूर
विद्यार्थ्यांच्या मधील कौशल्य बघून करिअर निवडला पाहिजे अभ्यासू विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा तर विविध कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यवसाय करावा असे मत प्रसिद्ध वक्ते रवींद्र खैरे यांनी केली
महाळुंगे तालुका करवीर येथे बोलत होते. माणिक कांबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त करिअर मार्गदर्शन व गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदीप चौगुले, सोनाली चौगले,निलम चौगले, वैभव पाटील,प्रतीक पाटील, सुरज बाटुगे, पल्लवी पाटील,अग्रगण्य पाटील,शहाजी चौगले यांचा सत्कार करण्यात आला यासह सरपंच, नूतन संचालक भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ प्रमोद पाटील,
दत्ता परीट यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
खैरे म्हणाले, विद्यार्थ्यांच्यामध्ये काय कौशल्य आहे हे बघून त्याला मार्गदर्शन करायला हवं नोकरी बरोबर व्यवसायामध्ये सुद्धा खूप काही करण्यासारखं असतं त्यासाठी पालकांनी मार्गदर्शन करायला हवे. कोणत्याही गोष्टीत अपयश आल्यास जिद्दीने सामोरे गेले तर त्याला यश मिळतं.
प्रशांत चुयेकर म्हणाले, एखाद्याच्या स्मृतिदिनानिमित्त समाजाला काहीतरी देणे लागतो या उद्देशाने प्रबोधन करणे हा उपक्रम कौतुकास्पद आहे. चळवळीचा कार्यकर्ताच असे करू शकतो प्रमोद हर्षवर्धन या अष्टपैलू व्यक्तिमत्वास समाजाने पाठिंबा दिला तर मोठे व्यक्तिमत्व घडाला वेळ लागणार नाही.
शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल दीपक पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार भोसले, उत्तम पोकर्णेकर,डी. के. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद हर्षवर्धन यांनी प्रस्तावित केले. राजेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.