हुपरी नगरपरिषदेने चुकीच्या पद्धतीने ठेका रद्द करावा
schedule13 Feb 25 person by visibility 70 categoryराजकीय
हुपरी नगरपरिषदेने चुकीच्या पद्धतीने ठेका
कोल्हापूर;
हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची यात्रा परंपरेनुसार अंबाबाई यात्रा कमिटी भरत असते. सदरची यात्रेनिमित्त अनेक प्रकारच्या स्पर्धा कुस्त्या, सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम यात्रा कमीटी घेत असते. सदर कार्यक्रमासाठी येणारा खर्च लोकवर्गणी, यात्रा पाला भाडे यामधुन यात्रा कमिटीकडून केला जातो. परंतु चालू वर्षी हुपरी नगरपरिषदेने एका व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने ठेका दिलेला आहे. यात्रा काळातील ठेका रद्द करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात दिलेले वसुलीचे दर अतिशय अन्यायकारक आहेत.वसुलीसाठी पद्धत योग्य वाटत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरचा ठेका यात्रा काळामध्ये रद्द करणेत यावा. यात्रा काळातील ठेका रद्द न झालेस नागरिक गाव बंद करण्याच्या तयारीत आहेत. तरी यात्रा काळातील ठेका रद्द करणेत यावा ही मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष नंगरसेवक सुभाषराव कागले, जवाहर साखर कारखाना संचालक उपनगराध्यक्ष मा. श्री. सुरज बेडगे, देवाप्पा शामराव मुधाळे,देवापाशामराव मुधाळे, नगरसेवक रफीक मुल्ला, मा. श्री. दौलत पाटील,मा. श्री. गणेश वाईगडे,मा. श्री. मोहन वाईगडे, श्री. प्रतापराव जाधव, श्री. बाहुबली गाट,मा. श्री. पृथ्वीराज गायकवाड,मा. श्री. भरत चौगुले,मा. श्री. सौरभ खोत,मा. श्री. संग्राम जाधव,मा. श्री. जगदीश पाटील,मा. श्री. सुरेश तराळ आदी उपस्थित होते.