जेईई मेन निकालात द्रोणा अकॅडमीच्या दहा विद्यार्थ्यांना 90 परसेंटाइल पेक्षा अधिक गुण
schedule12 Feb 25 person by visibility 57 categoryशैक्षणिक

जेईई मेन निकालात द्रोणा अकॅडमीच्या दहा विद्यार्थ्यांना 90 परसेंटाइल पेक्षा अधिक गुण
कोल्हापूर (आवाज इंडिया)
जेईई मेन 2025 सेशन-1 परीक्षेच्या निकालामध्ये कोल्हापुरातील द्रोणा अकॅडमीचे अर्चित मुरली पलक रोहिडा' याने 99.913 परसेंटाइल (percentile) मिळवत यश संपादन केले तर याच अकॅडमीतील 14 पैकी पाच विद्यार्थ्यांनी 95 टक्के पेक्षा अधिक तर पाच विद्यार्थ्यांनी 90 परसेंटाइल पेक्षा अधिक गुण संपादन केलेले आहेत.
जानेवारी 2025, मधे झालेल्या JEE - MAIN च्या session 1 च्या परिक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाला. कोल्हापूरातील द्रोणा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यंदा झालेल्या परिक्षेना 14 मुले बसली होती. त्यातील 10 मूले अँकेडमी मधून 90 परसेंटाइल पेक्षा पुढे आहेत.
'अर्चित मुरली पलक रोहिडा' याने 99.913 परसेंटाइल
(percentile) प्राप्त केले आहेत. युगंधरा सुजित स्वप्नाली मोहिते (97.635), मीत हर्ष रिया भटेजा (97.48), गौरव अण्णासाहेब विमल नाईक (96.658), संजीत नितीन सरिता केसरकर (95.658), दशल सचिन किर्ती मोदी (94.525), केविन दिपक
सारिका लालवानी (94.33), आरोहि अमित गायत्री बेंडके (94-00), युगंधरा श्वेता कणेरकर (90.728), घनश्याम बेंडके (90.728) यांनी यश संपादन केले.
NIT मधून M-Tech करून Volvo सारख्या कंपनीत Job करत असताना भावी पिढीला योग्य मार्गदर्शन व्हावे, यासाठी 2017 साली द्रोणा अँकेडमी चे संचालक कर्णजीत रणजीत अंजली गावडे यांनी 'द्रोणा' अँकेडमीची स्थापना केली.
या अँकेडमी मधे JEE-CET आणि 8 वी ते 10 वी Foundation यासाठी मुलांची तयारी करून घेतली जाते. मुलांना योग्य परिक्षेसाठी मार्गदर्शन करत असताना आयुष्यामधे येणाऱ्या आव्हानांसाठी त्यांची मानसिकता तयार करणे हे या अकॅडमीचे उद्दिष्ट आहे