माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रि.पा.ई. गवई पक्षाच्या वतीने स्वागत
schedule18 Aug 26 person by visibility 30 categoryराजकीय
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रि.पा.ई. गवई पक्षाच्या वतीने स्वागत
कोल्हापूर (प्रतिनिधी):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाच्या वतीने माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे हॉटेल सयाजी येथे पुष्पगुच्छ देऊन भावूक व जंगी स्वागत करण्यात आले. रि.पा.ई. चे प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही भेट घेतली.
या सत्कारप्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे यांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. "आपल्या दूरदृष्टी आणि विचारांच्या प्रयत्नांमुळेच कोल्हापूरचा कित्येक वर्षांचा प्रलंबित असलेला खंडपीठाचा प्रश्न यशस्वी होऊ शकतो. सध्याचे सर्किट बेंच हे उद्याच्या पूर्ण खंडपीठाची नांदी ठरणार आहे," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या शिष्टमंडळामध्ये रि.पा.ई. चे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश हुपरीकर, सरचिटणीस संदिप हेर्लेकर, जगन्नाथ सोरटे, साताप्पा कांबळे केर्लीकर, बैसु कांबळे यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.