Awaj India
Register
Breaking : bolt
आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*राष्ट्रीय सबज्युनिअर बेसबॉल स्पर्धेकरीता कु.स्वराज रुपेश सागर ची ओडिसा येथे निवडगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई ५४०० रुपये दंड वसूलअपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या बदली व पुनर्नियुक्तीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गर्जना संघटनेची मागणीभाजपचे मनसुबे हाणून पाडणार; 'डीपीआय' उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणारइंजिनिअरिंग १३ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी:उच्च न्यायालयाचा दिलासा कोल्हापूर खंडपीठाचा अंतरिम आदेशकोल्हापुरात विंचारेमाळ येथे जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्तवकिलाला मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करा; ॲड. तौसिफ शेख यांची मागणीयुनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून* *डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट*हुपरीत ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन; रक्तासाठीची नागरिकांची धावपळ थांबणार

जाहिरात

 

आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*

schedule18 May 26 person by visibility 5 category

*डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकतर्फे*  
*आज डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन*
- दहावीनंतरच्या करीअर संधी बद्दलही मार्गदर्शन 
 
कसबा बावडा
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने 'दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया' याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. मंगळवार (दि. १९ मे ) सकाळी १० वाजता कसबा बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे.
 
   दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी हा टप्पा फार महत्त्वाचा ठरतो. दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे? याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट ध्यानात घेऊनच डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत ? करिअर क्षेत्र कसे निवडावे ? याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याबरोबरच डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे होते प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, शासनाच्या वतीने कोणकोणत्या स्कॉलरशिप दिल्या जातात, याबद्दलही कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे.
 
या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य प्रा. नितीन माळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes